मुंबई : दीड वर्षांपासून अवघ्या जगाला वेठीस धरणारा कोरोना विषाणूचा संसर्ग आता कुठे आटोक्यात येत असल्याचे दिसत असतानाच दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमीक्रोन या नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा संपूर्ण जगाला धडकी भरली आहे. शुक्रवारी (ता. २६) जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूबद्दल चिंता व्यक्त करताच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक घेऊन आरोग्य मंत्रालयाला सज्ज राहण्याच्या सूचना केल्या; राज्य सरकारनेदेखील संसर्ग रोखण्यासाठी नियम आणखी कठोर करत नागरिकांना या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
नियम तोडणाऱ्यांकडून जबर दंड वसूल केला जाणार आहे. राज्य सरकारच्या नवीन नियमावलीनुसार, दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच आता सार्वजनिक वाहतुकीचा वापर करता येणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील आज सर्व जिल्हे, महापालिका प्रशासनाची तातडीने बैठक बोलावून त्यांना सज्ज राहण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे किमान यंदा तरी डिसेंबरमधील ख्रिसमस आणि नववर्ष उत्साहात साजरे करण्याच्या नागरिकांच्या अपेक्षेवर चिंतेची गडद छाया पसरली आहे.
राज्य सरकारचे नवे नियम
मुंबईतील लोकल ट्रेनप्रमाणे एसटी, बससेवा, टॅक्सी, रिक्षातून प्रवास करायचा असेल तर दोन डोस घेतलेल्यांनाच परवानगी
कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार
रिक्षा, टॅक्सीतील प्रवाशाला मास्क नसेल तर ५०० रुपये आणि रिक्षा-टॅक्सी चालकालाही ५०० रुपये दंड
दुकानात आलेल्या ग्राहकाने मास्क घातला नसेल तर ग्राहकाला ५००, तर दुकानदाराला १० हजार रुपये दंड
मॉलमध्ये ग्राहकांच्या चेहऱ्यावर मास्क नसेल तर मालकाला तब्बल ५० हजार रुपयांचा दंड. वारंवार असा प्रकार घडत असल्यास मॉल, दुकान, सभागृह सील करण्यात येतील.
नियम पाळत राजकीय सभा, जाहीर कार्यक्रम घेता येणार,
नियम न पाळणाऱ्या आयोजकाला ५० हजार रुपयांचा दंड
आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांचे लसीकरण आवश्यक. ७२ तास अगोदरचे आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र सक्तीचे
बंदिस्त सभागृहात होणारे लग्नसोहळे, सिनेमागृह, नाट्यगृह तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांना आसन क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीची परवानगी.
खासगी वाहनांमधून प्रवास करण्यासाठी दोन डोसची अट नसेल.
देशभर
गुजरात सरकारकडून नवी नियामवली जारी
मुंबईत येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या होणार
मध्य प्रदेश सरकारचाही चाचण्यांवर भर
केरळमध्ये यंत्रणेला सावधगिरीचे निर्देश
दिल्लीत सरकारी कार्यालयांत नियमांची सक्ती
कर्नाटकमध्ये
४८ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.