मुंबई ; लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर वाहन उत्पादक कंपन्या कार विक्रीमध्ये हळूहळू पीक अप घेऊ लागल्या आहे. मे महिन्याच्या तुलनेच जून महिन्यात कार विक्रीमध्ये मोठी सुधारणा झाली असून. हुंडाई मोटर्स आणि मारुती सुजुकी कंपनीने मे महिन्याच्या तुलनेत तिपट्ट कार विक्री केल्या आहे. दूसरिकडे दुजाकी वाहनांच्या खपातही मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.
कोरोना संसर्गाच्या धास्तीमुळे सार्वजनिक प्रवास टाळण्यासाठी अनेकांनी कार खरेदी करण्याला पसंती दाखवली आहे. त्यामुळे मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात कार खरेदीसाठी मागणी वाढली आहे. पेट्रोल, डिजेलच्या किंमतीत वाढ होत असल्यामुळे ग्राहकांनी सिएनजी कार खरेदीकडे आपला मोर्चा वळवला असल्याचे चित्र आहे. एप्रिल महिन्यात एकही कार विकली गेली नव्हती हे विशेष
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने जून महिन्यात 51,274 कारची विक्री नोंदवली. मे महिन्यात कंपनीच्या केवळ 13, 865 कार खपल्या होत्या. मात्र 2019 मध्ये मारुतीने जूनमध्ये तब्बल 1,11,014 कार ; तर मे महिन्यात 1,23,250 कार विक्रीचा टप्पा गाठला होता. मारुतीच्या छोट्या आणि कॉम्पक्ट सेगमेंटमधील सर्वधिक म्हणजे 37 हजारापेक्षा अधिक वाहने विकली गेली आहे. या वाहनांमध्ये सिएनजी यंत्रणा लावलेल्या आहेत किंवा लावणे शक्य आहे.
हुंडाई मोटर्सने जून महिन्यात एकुण 21,320 कार विक्रीची नोंद केली, मे महिन्यात कंपनीच्या केवळ 6,883 कार विकल्या गेल्या होत्या. 2019 मध्ये जून महिन्यात कंपनीने 42, 502 वाहने; तर मे महिन्यात 42,007 वाहने विकली गेली होती.
मात्र गेल्या वर्षीच्या विक्रीची तुलना केल्यास मारुती कंपनीच्या विक्रीत 53.8 टक्के तर हुडांईच्या विक्रीत 49 टक्के एवढी घट झाली आहे. कार बुकींग आणि कार खरेदीसाठीची चौकशीचे प्रमाण 80- 85 टक्क्यावर आले आहे. ही समाधानाची बाब असल्याचे कार उत्पादक कंपन्यांचे म्हणणे आहे.
जून महिन्यात टोयाटा किर्लोस्कर मोटर्सच्या 3,866 कारची विक्री झाली. मे महिन्यात कंपनीच्या केवळ 1639 कारचा खप होऊ शकला होता. होंडा मोटर्सने जून महिन्यात 1398 कार विकल्या.
'हे' शहर आज सायंकाळी 5 पासून थेट 12 जुलैपर्यंत थांबणार ! कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचे आयुक्तांचे निर्देश
...
दुचाकी वाहनांचा खप वाढला
कारच्या तुलनेत दुजाकी वाहनांच्या विक्रीत मोठी सुधारणा असल्याचे दिसून आले आहे. हिरो मोटर कॉर्पने मे महिन्यात 1,12,682 दुजाकी विकल्या होत्या. जून महिन्यात कंपनीने 4,50,744 दुजाकी डिलरला दिल्या आहेत. ग्रामिण आणि निम्मशहरी भागातून दुजाकी खरेदीस जास्त मागणी आहे.मान्सून आणि रब्बी पीक चांगले होण्याच्या अंदाजामुळे दुजाकी वाहनांचा खप वाढणार असल्याचा अंदाज हिरो मोटर्सचे संचालक पवन मुजांल यांनी व्यक्त केला आहे.
कोरोनामुळे सार्वजनिक वाहतूकीचा पर्याय टाळत आहेत. त्यामुळे अनेक जण कार खरेदी करत आहेत. त्यामुळे जून महिन्यात विक्री वाढली असल्याचे मारुतीचे विक्री आणि मार्केटींग अधिकारी शंशाक श्रिवास्तव यांनी म्हटले आहे.
लॉकडाऊन शिथील, कार खरेदीमध्ये वाढ
जूनमध्ये मारुती, हुडांईच्या कार खरेदीमध्ये तिप्पट, चौपट्ट वाढ
मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत कार विक्रीत 55 ते 40 टक्के घट
कार बुकींग आणि चौकशी 80 ते 85 टक्क्यांवर
कोरोनाच्या भितीमुळे ग्राहकांचा कार खऱेदीकडे ओढा
कार खरेदीला ग्रामिण भागातून अधिक प्रतिसाद
पेट्रोलच्या किमंतीमुळे ग्राहकांची सिएनजी कार खरेदीला पंसती
कारपेक्षा दुचाकी वाहनांच्या मागणीत मोठी वाढ
चांगला पाऊस, बंपर रब्बी हंगामाच्या अंदाजामुळे दुचाकी वाहन विक्रीत वाढ होणार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.