मुंबई ः मुंबई विमानतळावर मालवाहू विमानाचा अपघात टळला आहे. बंगळूरहून आलेले हे विमान आपल्या निश्चित स्थळी न थांबता पुढे गेल्याने काहीसा गोंघळ उडाला होता, पण या विमानाला धावपट्टीवरुन दूर करण्यात आले आणि उड्डाणात कोणताही अडथळा आला नाही. बंगळूरहून मुंबईत उतरताना फेडएक्स चौदा क्रमांकाच्या धावपट्टीवर उतरणार होते, पण ते ठरलेल्या ठिकाणी तसेच वेळेवर थांबले नाही आणि ते धावपट्टी सोडून नऊ मीटर गेले. यापूर्वीही पावसाळ्यात या प्रकारच्या घटना घडल्या आहेत, पण यावेळी वाहतूक मोठ्या प्रमाणावर नव्हती तसेच विमान तातडीने दूर केल्यामुळे वाहतूकही थांबली नाही. या 29 वर्षे वापरात असलेल्या विमानाचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बंगळूरहून आलेले हे मालवाहू विमान मुंबईला थांबून दुबईला जाणार होते.
दरम्यान, जोरदार वादळी हवामानामुळे मुंबईतील हवाईसेवा दुपारी अडीच ते सातपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. जोरदार वारे वहात असल्यामुळे भारतीय विमानतळ प्राधीकरणाबरोबर चर्चा केल्यानंतरच हा निर्णय झाला असल्याचे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई : निसर्ग चक्रीवादळामूळे अलिबाग आणि इतर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केल्यानंतर वेगाने चक्रीवादळ मुंबईत पोहचत आहे. त्यामूळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विमानतळ साडेचार तास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2.30 वाजता विमातळ बंद करण्यात आले असून संध्याकाळी 7 वाजता उघडण्यात येणार असून, त्यानंतरचे विमान सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळामूळे मुंबई महानगरपालिका आणि इतर सर्व यंत्रणांनी अलर्ट जाहीर केला आहे. त्यासाठी एसटी, रेल्वे, विमानसेवेने सुद्धा सुरक्षेच्या दृष्ट्रीने निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. मुंबई विमानतळावरील दिवसभरातील विमान सेवा रद्द करण्यात आली आहे. तर अडीच वाजता पासून विमानतळ बंदच करण्याचा निर्णय विमानतळ प्रशासनाने घेतला आहे. यादरम्यान विमानतळावर असलेले प्रवासी विमानतळावर सुरक्षीत ठिकाणी असून, संध्याकाळी 7 नंतरच विमान सेवा सुरू होण्याची शक्यता विमानळ प्रशासनाने सांगितले आहे.
चक्रीवादळामूळे विमानतळावरील कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, त्यासाठी विमानतळ प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना सुद्धा पाळण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.