मुंबई : सणासुदीच्या काळात (Festival) अन्न व औषध प्रशासनाची (Food and Drug department) भेसळ करणाऱ्यांवर करडी नजर असणार आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये राज्यातील जनतेला सकस, निर्भेसळ आणि भेसळमुक्त मिठाई (Mixture sweet) व इतर अन्न पदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून कडक कार्यवाही (Strict Action) करावी असे आदेश एफडीए प्रशासनाकडून (FDA Authorities) देण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी एफडीए कार्यालयात जाऊन सर्व सहकाऱ्यांसह आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंग, सर्व सह आयुक्त प्रत्यक्ष व इतर जिल्हास्तरीय अधिकारी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. डॉ. शिंगणे म्हणाले, जिल्हा स्तरावरील अधिका-यांनी मिठाई व इतर खाद्य पदार्थांच्या उत्पादकांसोबत बैठक घ्यावी. त्यांना योग्य ते निर्देश द्यावेत. मिठाई व इतर पदार्थांवर तयार करण्याची आणि संपण्याची दिनांक टाकणे आवश्यक आहे, याबाबत जन जागृती करावी.त्याचबरोबर दुध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ तपासणी वाढवावी आणि त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्यात यावा.
फार्मासिस्ट नसलेल्या केमिस्टवर कारवाई
औषध प्रशासनातर्फे तपासणीत ज्या औषध विक्री दुकानात फार्मासिस्ट नाहीत असे आढळलेल्या दुकानांचे परवाने रद्द करणे, आयुर्वेद, ॲलोपॅथी व इतर औषध निर्मीतींचा दर्जा सातत्याने तपासला जाणे आणि विभागातील पदभरती इत्यादी विषयांचा यावेळी आढावा घेण्यात आला.
31 लाख किंमतीचा साठा जप्त
यावेळी 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत अन्न व औषध प्रशासनाकडून दुध या अन्न पदार्थाच्या कारवाईत 4,60791 रुपये किंमतीचा माल तर दुग्धजन्य पदार्थाच्या कारवाईत रुपये 39,50,386 किंमतीचा माल जप्त करण्यात आला. तर धाडी जप्तीत 526.10 लाख किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. सणासुदीच्या तोंडावर घेण्यात आलेल्या मोहिमेत खवा, मावा, मिठाई, खाद्य तेल, तुप, रवा मैदा, बेसन मसाले अशा भेसळ युक्त वस्तुंचा रुपये 31,11,514 किंमतीचा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.