मुंबई, धारावी : धारावीतील प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत, जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी हा निर्णय घेतला.
खासदार शेवाळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, धारावीतील 150 खासगी डॉक्टरांनी पालिकेच्या मोहिमेत सहभागी होण्याची तयारी दाखविल्याने येत्या 10-12 दिवसांत संपूर्ण धारावी परिसरातील नागरिकांची कोरोना चाचणी करणे पालिकेला शक्य होणार आहे. सहाय्यक आयुक्तांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीत, खासदार शेवाळे, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, इंडियन मेडिकल कौन्सिलचे उपाध्यक्ष डॉ. अनिल पाचनेकर, डॉ. सुरेंद्र सिगनापुरकर यांसह स्थानिक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
धारावीवरील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर खासगी डॉक्टरांनी पालिकेच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार राहुल शेवाळे यांनी केले होते. या आवाहनाला, इंडियन मेडिकल कौन्सिल आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने, धारावीतील 150 खासगी डॉक्टर्स पालिकेच्या मोहिमेत सहभागी होणार आहेत.
या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना खासदार राहुल शेवाळे म्हणले की, "2 खासगी डॉक्टर्स आणि 3 पालिका वैद्यकीय कर्मचारी असे 5 जणांचे पथक सुमारे 5000 नागरिकांची चाचणी करणार आहे. अशा पथकांच्या माध्यमातून 10- 12 दिवसंत धारावीतील सुमारे साडे सात लाख नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा रीतीने त्वरित निदान झाल्यास बाधितांना धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये उपचरारासाठी दाखल केले जाईल, तर लक्षणे आढळणाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात येईल."
याचबरोबर, धारावी पोलीस स्थानक आणि रुग्णालयांच्या ठिकाणी सॅनिटायझर टनेलही लवकरच उभारण्यात येणार असल्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
to fight against corona what is mission dharavi read full story
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.