Crime News esakal
मुंबई

Crime News : कल्याणच्या 100 फुटी चौक रस्त्यावर फिल्मी स्टाईल थरार; चार ते पाच जणांकडून धारदार शस्त्राने तरुणाची हत्या

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण पूर्वेत रहदारीच्या वेळेस भर रस्त्यावरच एका तरुणाला चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी सायंकाळी पूर्वेतील 100 फुटी चौक परिसरात ही घटना घडली असून संदीप राठोड असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय असून कोळसेवाडी पोलीस याचा तपास करीत आहे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सोमवारी सायंकाळी कल्याण पूर्वेत भर दिवसा भर रस्त्यात एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या चौकात हत्या झाली तो चौक अतिशय रहदारीचा चौक आहे. त्या रस्त्याने हजारो गाड्या रोज ये-जा करतात. पण असं असलं तरीही या चौकात दिवसाढवळ्या एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या भयानक घटनेमुळे कल्याण पूर्वेत एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर कल्याणमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला जत आहेत.

कल्याण पूर्वेतील चेतना परिसरात 100 फुटी रस्त्याच्या नाक्यावर ही घटना संध्याकाळच्या सुमारास घडली. चार ते पाच जणांच्या टोळक्याने फिल्मी स्टाईलने येत तरुणावर धारदार हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला. संदीप राठोड असं मृत तरुणाचे नाव आहे. तो महालक्ष्मीनगर परिसरात राहतो. जुन्या वादातून संदीप याचे हत्या झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत तपास सुरु केला आहे. भर चौकात हत्या झाल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वारंवार अशा घटना घडत असून पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT