मुंबई : कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेने 31 ऑगस्टपर्यंत कर्जाचे हफ्ते न भरण्याची मुभा ग्राहकांना दिली होती. यामध्ये वाहन कर्जाच्या हफ्त्याचाही समावेश होता. मात्र, या काळातही वित्तीय कंपन्यांनी ओला, उबर आणि इतर टॅक्सीचालकांच्या मागे हफ्ते भरण्याचा तगादा लावल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मुंबईत टॅक्सीसेवा अजूनही सुरळीत झाली नाही. त्यामुळे अनेकांच्या संसाराची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यात फायनान्स कंपन्यांच्या तगाद्यामुळे अडचणीत भर पडल्याचे टॅक्सीचालकांचे म्हण्णे आहे.
रिझर्व्ह बँकेने सुट देऊनही वित्तीय संस्थाकडून टॅक्सीचालकांना हफ्ते भरण्यासंदर्भात दबाव टाकला जात आहे. हफ्ते न भरल्यामुळे मुंबईतील जवळपास 150 टॅक्सी जप्त करण्यात आल्याचे ओला-उबर ड्रायव्हर संघटनेने पदाधिकारी आनंद कुंटे यांनी सांगितले. यापैकी काही टॅक्सीचालकांनी हफ्ते भरणे शक्य नसल्यामुळे आपली टॅक्सी जमा केल्या आहेत किंवा त्यांच्यावर जमा करण्याचा दबाव टाकला गेला, असे कुटे यांचे म्हण्णे आहे.
कोरोना संसर्गामुळे अनेक टॅक्सी चालक आपल्या टॅक्सी कमी किमंतीत विक्री करत आहेत. टॅक्सी संघटनेसंबंधीत समाज माध्यमावरील प्रोफाईलमध्ये या संदर्भात अनेक जाहिराती येत आहे. अनेकांनी टॅक्सी खरेदीसाठी महिंद्रा, ए यु फायनान्स सारख्या काही नॉन बँकीग अर्थपुरवठा कंपन्याकडून कर्जे उचलली आहे. माझ्याकडे या प्रकारच्या खूप तक्रारी आल्यामुळे मी या कंपन्यासोबत बोलून कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी थोडा अवधी द्यावा, अशी विनंती केल्याचे अॅप्स आधारीत वाहतूक संघटनेचे प्रशांत सावर्डेकर यांनी सांगितले.
टॅक्सीमेन यूनीयनशी संलग्न अनेक टॅक्सीचालकांनी कोरोनाच्या काळात मुंबई सोडली. मात्र, अनेक टॅक्सीचालकांना वसूली एजंटकडून पैसे फेडण्याचे कॉल येत असल्याची माहिती टॅक्सीमेन यूनीयनचे अध्यक्ष ए एल कॉड्रोस यांनी दिली. या कंपन्यांना रिझर्व्ह बँकेने कर्ज फेडण्याची सुट दिल्याची आठवण मी संबधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना करुन दिल्याचे कॉड्रोस यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परिक्षांबाबत मंत्री अमित देशमुखांनी कुलगुरूंना दिल्या महत्वपुर्ण सूचना... वाचा
दबाव टाकला नाही
रिझर्व बँकेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात असून, कुणावरही हफ्ते फेडण्याचा दबाव टाकला नसल्याचे महिंद्रा फायनान्स कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. तर, रिझर्व बँकेने सुट दिल्यावरही अनेक ग्राहकांनी नियमीत हफ्ते फेडल्याची माहिती, ए यू स्माल फायनान्स बँकेच्या प्रवक्त्यांनी दिली. मात्र, आम्ही कुणावरही दबाव टाकला नाही किंवा वाहन जप्त करण्याची कारवाई केली नसल्याचे त्यांनी सांगितले.
संसाराचाच गाडा अजून रुतलेला
लॉकडाऊन लागू केल्यापासून टॅक्सी सेवेला मोठा फटका बसला. निर्बंध काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर अजूनही सेवा पुर्णपणे सुरु झालेली नाही. अटी-शर्थींसोबत टॅक्सी सेवा सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली. मात्र, ग्राहकांचा पाहीजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही. अशात फायनान्स कंपन्या कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी तगादा लावत आहेत. मात्र, आमच्याच संसाराचा गाडा अजून पुर्वपदावर आल्या नसल्याने त्यांच्या कर्जाचे हफ्ते कसे फेडायचे हा मोठाच प्रश्न असल्याचे टॅक्सीचालकांचे म्हण्णे आहे.
-----------------------------------------------------
Edited by Tushar Sonawane
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.