Currency 
मुंबई

Navi Mumbai: लॉजमध्ये बसून फेक नोटा छापत होतं जोडपं; कारमध्ये फिरायचे, दररोज ऑनलाईन फूड मागवायचे

Printing Fake Currency In Lodge: एक महिला आणि एक पुरुष नवी मुंबईतील महापे येथील लॉजमध्ये फेक नोटा छापत असल्याची माहिती युनिटला मिळाली होती.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- फायनान्सियल इंटेलिजन्स युनिट Financial Intelligence Unit (FIU)ने नवी मुंबईमध्ये मोठी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. एक महिला आणि एक पुरुष नवी मुंबईतील महापे येथील लॉजमध्ये फेक नोटा छापत असल्याची माहिती युनिटला मिळाली होती. आरोपींचे नाव विवेक कुमार प्रेमबाबु पिपळे (वय ३५) आणि अश्विनी विश्वनाथ सरोदे (वय ३६) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही आरोपी गेल्या चार महिन्यांपासून कृष्णा पॅलेस लॉजमध्ये राहात होते.FIU च्या अधिकाऱ्यांनी लॉजवर छापा टाकला. याठिकाणाहून १३ मोबाईल फोन, स्कॅनर, प्रिंटर आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ते एकमेकांचे भाऊ-बहिणी असल्याचं सांगत आहेत. पण, याबाबत अधिक तपास सुरु आहे. दोघेही गेल्या एक वर्षापासून बेरोजगार होते.

सरोदे ही याधी बँकेमध्ये सेल्स विभागामध्ये काम करत होती असं सांगण्यात येत आहे, तर पिपळे हा सेकंड हँड कारचा डिलर होता. हे गेल्या चार महिन्यांपासून लॉजमध्ये राहत होते. नेहमी ऑनलाईन फूड मागवत होते. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, छाप्यादरम्यान त्यांना पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटा लॅपटॉवर स्कॅन केलेल्या आढळल्या आहेत.

जप्तीदरम्यान अधिकाऱ्यांना शाई, बाँड पेपर आढळून आले आहेत. याचा वापर प्रिंटआऊट काढण्यासाठी केला जात होता. अधिकाऱ्यांना ७७ हजार खरी रोकड आणि ८१ हजार रुपयांचे फेक नोट आढळले आहेत. दोघेही कारमध्ये फिरायचे आणि लॉजमध्ये राहायचे. ते लक्झरी लाईफस्टाईल जगत होते. त्यांच्याकडे कोणताही जॉब नव्हता.

कोणताही जॉब नसताना ते ऐषोआरामात राहत असल्याने त्यांच्यावर संशय बळावला. त्यांनी आतापर्यंत किती रुपये नोटा छापले आहेत, हे अद्याप समजू शकलेलं नाही, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. युनिटच्या अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की, पिपळेकडे फेक ओळखपत्र होतं, तो स्वत:ला संरक्षण दलातील अधिकारी असल्याचं सांगायचा. तो टोल नाक्यावर पैसे न देता निघून जायचा. यासाठी तो ओळखपत्राची मदत घ्यायचा.

पिपळेची आई पनवेलमध्ये राहते, तर सरोदेची आई खारघरमध्ये राहते. सरोदे आईला सोडून लॉजमध्ये राहत होते. त्यानंतर त्याठिकाणी पिपळे देखील आला. आरोपींना शनिवारी कोर्टासमोर हजर करण्यात आले. कोर्टाने दोघांना २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT