Ravindra Waikar VS AMOL KIRTIKAR 
मुंबई

Mumbai North-West: रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याविरोधात गुन्हा? मतमोजणी केंद्रावरील CCTV फुटेज देण्यास आयोगाचा नकार

Mumbai North West constituency: जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणीवेळीचा सीसीटीव्ही देण्यास नकार दिल्याची माहिती आहे. त्यामुळे कीर्तिकर यांना धक्का बसला आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना ४८ मतांनी पराभूत व्हावे लागले. याप्रकरणी अमोल कीर्तिकर यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. मतमोजणी दरम्यान गैरप्रकार झाल्याचा त्यांचा आरोप आहे. याप्रकरणी, जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणीवेळीचा सीसीटीव्ही देण्यास नकार दिल्याची माहिती आहे. त्यामुळे कीर्तिकर यांना धक्का बसला आहे.

मतमोजणीच्या दिवशी रवींद्र वायकर यांचे मेहुणे मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईलचा वापर करत होते असा आरोप आहे. याप्रकरणी हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह यांनी निवडणूक आयोगाकडे आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. मात्र, उमेदवाराच्या तक्रारीची दखल न घेता, तहसीलदारांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. उमेदवार भरत शाह यांना साक्षीदार केलं असल्याची माहिती आहे. आरोपीचे नाव मंगेश पंडीलकर असं असून तो वायकर यांचा मेहुणा असल्याचं सांगण्यात येतंय.

ईव्हीएम ज्या ठिकाणी ठेवले आणि मतमोजणी ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज देण्यात यावे अशी मागणी अमोल कीर्तिकर यांनी नोडल अधिकाऱ्याकडे केली होती. पण, अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला आहे. साम टीव्हीच्या वृत्तानुसार, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सीसीटीव्ही फुटेज देणे कायद्यात बसत नसल्याची माहिती कीर्तिकरांना दिली आहे.

उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर विरुद्ध शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यामध्ये लढत झाली. यात वायकर यांनी कीर्तिकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव केलाय. विशेष म्हणजे फेरमतमोजणीमध्ये वायकरांना विजयी घोषित करण्यात आले. पहिल्या मतमोजणीवेळी कीर्तिकर यांना २ हजार मतांनी विजयी घोषित करण्यात आलं, पण वायकर यांनी फेरमोजणीची मागणी केली होती. यात त्यांचा विजय झाला. अमोल कीर्तिकर यांनी याप्रकरणी गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून कोर्टात जाण्याची तयारी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT