झाडांची कत्तल करणाऱ्यांवर FIR दाखल
मुंबई: वसुंधरा दिनानिमित्त ५ जूनला वसुंधरा अभियान सुरू करण्यात आलं. पण दुर्दैवाने त्याच दिवशी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात झाडांची कत्तल करण्यात आली. आजूबाजुला असलेल्या होर्डिंग्ससाठी ही झाडे अडचणीची ठरत असल्याने त्या झाडांची कतल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. तसेच, या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे असेही त्यांनी स्पष्ट केलं. (FIR Filed against those who cut down trees in Worli informs Mumbai Mayor Kishori Pednekar)
'इतकी छोटी झुडपे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कापली. झाडे मोठी झाल्यावर होर्डिंग्स लावायला त्रास होऊ शकतो म्हणून हे करण्यात आल्याचं बोललं जातंय. आपण रेल्वेला या प्रकरणी पत्र देणार आहोत. ती झाडं कोणी कापली याची विचारणा आपण पत्राद्वारे नक्कीच करू. कापलेल्या झाडांच्या जागी देशी झाडं येत्या आठवड्यात लावली जातील. नव्याने लावण्यात येणारी झाडे ही माती नसली तरी घट्ट पकडून राहतील अशी झाडं लावली पाहिजेत", असे त्यांनी सांगितले.
"70 ते 80 वयापेक्षा जास्त वय असलेल्या झाडांना तोडल्यावर वेगवेगळे नियम असतात. सध्या विरोधक या गोष्टीचा संबंध जागतिक पर्यावरण दिनाशी लावत आहेत. आरोप करणारे काहीही करू शकतात. तुम्ही सारे आमदार आहात, बिल्डर आहात, तुम्ही काहीही आरोप करू शकता. विरोधक म्हणतात की ही होर्डिंग गँग आहे. तसं असेल तर ते कोण आहेत सांगा, आपण त्यांच्यावर कारवाई करू. होर्डिंग हे रेल्वेचे आहेत, त्यामुळे त्यांच्याकडूनही विचारणा केली जाईल. पण आम्ही कशा पद्धतीने कारवाई करायची ते आम्हाला दुसऱ्यांनी सांगू नये", असे प्रतिक्रिया पेडणेकर यांनी दिली.
पावसाळा आणि मुंबई...
"येणारा पाऊस हा मुंबईला त्रास देणार नाही असा प्रयत्न करू. मुंबईत पाणी भरणार नाही हे मी म्हणणार नाही. पण मुंबईला धोका कमी होईल इतकं काम नक्कीच झालं आहे. पावसाळ्यात कामं होणारच आहेत. नाल्यांची खोली किती होती? किती गाळ काढला? या सगळ्या गोष्टी आपण प्रशासनला विचारणार आहोत. जास्तीत जास्त किती पाऊस पडेल हे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे आपण तयार राहूया", असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.