Tiger and Disha patani news  Team esakal
मुंबई

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी विरोधात FIR दाखल

दीनानाथ परब

मुंबई: प्रसिद्ध अभिनेता टायगर श्राँफ (Tiger Shroff) आणि अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) विरोधात मुंबई पोलिसांनी FIR नोंदवला आहे. या दोघांनी कोविड नियमांचे उल्लघंन केल्याचा आरोप पोलिसांनी त्यांच्यावर केलेला आहे. हे दोघंही बँण्डस्टँड परिसरात फिरत होते. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिस जशा प्रकारे कारवाई करत आहेत, त्याप्रमाणे पोलिसांनी या दोघांवर कारवाई केल्याचं बोललं जात आहे. (FIR has been registered against actors Tiger Shroff, Disha Patani in mumbai)

देशभरात कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. अशावेळी अनेक राज्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली होती. आता लॉकडाऊनचे नियम ब-यापैकी शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडताना दिसत आहे. बॉलीवूडमध्येही (bollywood) कोरोनाचा (corona) कहर वाढला होता. अनेक सेलिब्रेटींना (celebrities) कोरोनाची लागण झाली होती. त्याचा परिणाम निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यावर झाल्याचे दिसून आले आहे. काही चित्रपटांचे प्रदर्शनही पुढे ढकलण्यात आले आहे. अशातच बॉलीवूडमधील प्रसिध्द जोडी टायगर श्रॉफ (tiger shroff) आणि त्याची मैत्रीण दिशा पटानी (disha patani) हे एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहे.

सध्या राज्यात लॉकडाऊनचे (Lockdown) नियम शिथिल करण्यात आले आहे. याचा फायदा अनेकजण घेताना दिसत आहेत. त्याला बॉलीवूडमधील (bollywood celebrities) सेलिब्रेटींचाही अपवाद नाही. प्रसिध्द अभिनेता टायगर श्रॉफ (tiger) आणि दिशा पटानी (disha) हे दोघेही लाँग ड्राईव्हसाठी निघाले होते. त्यावेळी त्यांना पोलिसांना पकडले. आणि त्यांच्याकडे काही कागदपत्रांची मागणी केली. त्या दोघांच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर जोरदारपणे सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनमुळे घरातच राहावं लागल्यानं सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: नऊ दिवसांनंतर मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; मराठा समाजाला केलं 'हे' आवाहन

Swargate Metro Station Photos: आरारा... खतरनाक... अंडरग्राउंड स्वारगेट मेट्रो स्टेशनचे फोटो व्हायरल; उद्घाटनापूर्वी पाहा झलक

Zerodha Scam: झिरोधामध्ये सर्वात मोठा स्टॉक ब्रोकिंग घोटाळा; 15 लोकांनी केली करोडोंची लूट, 432 बनावट खाती

T20 World Cup साठी टीम इंडिया सज्ज! कर्णधार हरमनप्रीतने म्हणाली, 'आशिया कपमधील पराभवानंतर...'

Job Vacancies : संजीवनी नोकरी महोत्सव-२०२४ ऑक्टोबरमध्ये,शंभर कंपन्यांकडून १० हजार जागांसाठी मुलाखती अन् नियुक्तिपत्रे

SCROLL FOR NEXT