Udhayanidhi Controversial Remark on Sanatana Dharma 
मुंबई

Sanatana Dharma Row : युपी-बिहारनंतर उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात मुंबईत एफआयआर; काय आहे प्रकरण?

रोहित कणसे

सनातन धर्माबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे तमिळनाडुचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन हे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात देशातील वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यादरम्यान तमिळनाडूचे मंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात मुंबईतील मीरा रोड पोलिस ठाण्यात देखील एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सनातन धर्मावर केलेल्या वक्तव्याबद्दल नवीन एफआयआर दाखल करण्यात आला आहे . (Udhayanidhi Controversial Remark on Sanatana Dharma)

वेगवेगळ्या गटांमधील शत्रुता वाढवणे (IPC 153A) आणि धार्मिक भावना भडकावणे (IPC 295A) या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या आजारांशी केली होती आणि त्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आवाहन केले होते.

गेल्या आठवड्यात, उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी एक एफआयआर नोंदवण्यात आला होता. एफआयआरमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक खर्गे यांचे नावही उदयनिधी यांच्या वक्तव्याचे समर्थन करण्यासाठी घेण्यात आले आहे.या दोघांवर कलम 295A आणि 153A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहारमधील मुझफ्फरपूरयेथे देखील उदयनिधी यांच्याविरोधात एक तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, तामिळनाडूतील भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्य पोलिसांना निवेदन दिले असून, सत्ताधारी पक्षाचे नेते उदयनिधी यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यू या आजारांशी केली होती. तसेच त्याचे निर्मूलन करण्याचे आवाहन केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर वाद पेटला होता वाद निर्माण झाला होता . राष्ट्रीय स्तरावर मोठा राजकीय वाद निर्माण झाल्यानंतरही, उदयनिधी हे त्यांच्या शब्दांवर ठाम आहेत. त्यांनी कुठल्याही न्यायालयीन लढाईला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT