ठाण्यात कोव्हिड रुग्णालयातील औषध दुकानाला भीषण आग; रुग्णांना हलवण्याची वेळ!  
मुंबई

ठाण्यात कोव्हिड रुग्णालयातील औषध दुकानाला भीषण आग; रुग्णांना हलवण्याची वेळ!

दिपक शेलार

ठाणे : ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाघबीळ येथील दिया मल्टिस्पेशालिटी कोव्हिड रुग्णालयातील तिसऱ्या मजल्यावरील औषध दुकानाला मंगळवारी (ता. 11) रात्री 11 च्या सुमारास आग लागली. ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल आणि क्विक रिस्पॉन्स टीमने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने अनर्थ टळला. 

दरम्यान, सुरक्षिततेचा उपाय म्हणून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील (आयसीयू) दाखल असलेल्या चार रुग्णांना मुंबईतील भांडुप येथील भाटिया रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तब्बल 25 बेडची क्षमता असलेल्या ठाण्यातील दिया रुग्णालयात असलेल्या औषध दुकानाच्या वातानुकूलित यंत्रणेत शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने वर्तविला आहे. 

या आगीत औषध दुकानाचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, आगीची माहिती मिळताच दुर्घटना टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने तातडीची उपाययोजना करून घटनास्थळी 5 रुग्णवाहिका, तसेच बाळकूम येथील कोव्हिड रुग्णालयातील बेड सज्ज ठेवले होते, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख संतोष कदम यांनी दिली. 
-----------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT