textile mill photo 
मुंबई

आर्थिक राजधानी मुंबईत आजच्याच दिवशी पहिल्यांदाच वाजला होता गिरणीचा भोंगा, नाव होतं...

सुस्मिता वडतिले

प्रत्येकाचा आपला पेहराव व्यवस्थित असावा याकडे कल असतो. त्यामुळे कपडे खरेदी करताना कोण कपड्यांची क्वालिटी पाहतो तर कोण त्याचा रंग! आपआपल्या पसंतीनुसार म्हणजेच सुती कपडे, कॉटन कपडे, नायलॉन कपडे, खादी अशा अनेक प्रकारच्या आपाआपल्या आवडीनुसार खरेदी करत असतो. भारताच्या औद्योगिक क्षेत्राची पायाभरणी कापड उद्योगाने केली आहे. भारतीय कापड उद्योगाला प्राचीन इतिहास आहे. कापडचा जन्म भारतामध्ये झाला असल्याच्या नोंद एका पुस्तकात आहे.

मुंबई आणि कापड गिरण्यांचे अतूट नाते आहे, असे म्हटले जाते. यातून आर्थिक व सामाजिक जीवनाला वळण देणारी महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी ७ जुलै १८५४ मध्ये मुंबईत सुरू झाली. कावसजी दावर यांनी पाच लाख भांडवल गुंतवून ही गिरणी सुरु केल्याचे एका पुस्तकात म्हटलं आहे. ती त्यांनी यशस्वी चालवून दाखवली. बॉम्बे स्पिनिंग मिल या नावाची ही गिरणी होती. 

१८५४ मधे सुरू झालेल्या या पहिल्या गिरणीनंतर, पुढील सहा वर्षांत म्हणजे १८६० पर्यंत मुंबईत १० गिरण्यांची धुरांडी धूर ओकत होत्या. १८८० पर्यंत मुंबईतल्या गिरण्यांची संख्या वाढून ती ३१ पर्यंत पोहोचली. ही संख्या पुढे वाढतच राहीली. उद्यमशीलता व दूरदृष्टीच्या जोरावर कावसजी दावर भारताला उद्योग जगताचा मार्ग दाखवणारे पहिले भारतीय ठरले. ही भारतीय उद्योग क्षेत्रातील क्रांती होती. 

बघता बघता मुंबईत अनेक कापड गिरण्या सुरू झाल्या व मुंबई गिरणगाव ही नवी संस्कृती निर्माण झाली. हे सारे खरे असले तरी मुंबईला उद्यम नगरी बनविणाऱ्या पहिल्या कापड गिरणीचे व तिचे निर्माता कावसजी दावर यांचे महत्त्व अपार आहेत. परंतु आता सद्यस्थिती पाहता अनेक गिरण्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे कामगारांच्या पोटावर पाय पडले आहेत. त्यात कोरोनाची परिस्थिती पाहता अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशावेळी काय करावे आणि काय करु नये असे प्रश्न अनेकांना भेडसावत आहेत. या कापड गिरण्याचे लोन पुढे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांपर्यंत पोहोचले.

सोलापुरात सुद्धा कापड गिरण्या होत्या. मात्र आता बंद पडल्या आहे. सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात उभी असलेली चिमणी लक्ष वेधून घेते. ती कापड गिरणीचीच आहे. सोलापुरमध्ये अनेक कापड गिरण्या बंद झाल्या तेव्हापासून अनेकांवर उपासमारीची वेळ आली. सध्या खूप कापड गिरण्या सुरु आहेत. विश्‍वकोषमध्ये कापड गिरण्यांचा इतिहास आणि त्यातून झालेली प्रगती, त्याचे महत्त्व व कशा बंद पडल्या याच्या नोंदी आहेत.

गिरणीमुळे रोजगारांच्या संधी वाढल्या...

भारतातील प्रगतशील महानगर अरबी समुद्रावरील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर आणि भारताचे प्रवेशद्वार म्हणून मुंबईला संबोधण्यात येते. कावसजी दादर यांचे वडील मुंबईतील ख्यातनाम व्यापारी होते अनेक इंग्लिश कंपन्यांच्या व्यापाराचे ते हिंदुस्थान आणि चीन मधील एजंट होते. कावसजी दावर यांनी स्वतः व्यापारविषयक शिक्षण घेतले. मुंबईमध्ये गिरण्यांची संख्या जसजशी वाढत गेली. तसतसा रोजगारांच्या संधी वाढल्या. रोजगाराच्या संधीमुळे ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर आपल्या उदरनिर्वाहासाठी मुंबई शहरात स्थलांतरित झाले. रोजगारांच्या संधी आणि उदरनिर्वाहाची निश्चिती यामुळे ग्रामीण भागातील लोक मुंबई मध्ये गिरणी कामगार म्हणून मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले.

कापड गिरणीतील कामे...

अनेक वेगवेगळे कापड तयार करणे, कापड रंगवणे, कापडांचे वेगवेगळे प्रकार व कपड्यांवर रंगीत नक्षी उठवणे आदी कामे गिरणीत केली जात असे. या गिरण्यांमधे काम करणाऱ्या गिरणी कामगारांनी आपली घरं या गिरण्यांच्या आधाराने थाटली होती. परंतु त्यांच्यावरही सध्या संकट कोसळले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT