Fish Sakal media
मुंबई

रायगड जिल्ह्यात मासळी महागली; २०० रुपयांपासून ७०० रुपयांनी वाढले भाव

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : समुद्रातील वाढते प्रदूषण (Pollution is sea), बदलत्या वातावरणामुळे मासळी मिळण्याचे प्रमाण घटले आहे. दुसरीकडे मजूर, डिझेल आदींचे दरही (Diesel rate) वाढत असल्याने त्याचा परिणाम सुरमई, पापलेट, कोळंबी, बांगडा अशा मासळीचे भाव २०० रुपयांपासून ७०० रुपयांनी (Fish rate increases) वाढले आहेत. रायगड जिल्ह्यातील समुद्रात वेगवेगळ्या कंपन्यांचे सांडपाणी सोडले जाते. त्याचबरोबर जहाजांमधील तेळ गळतीमुळे मासळी उत्पादनावर परिणाम होत आहे.

गेल्या १५ फेब्रुवारीपासून केंद्र सरकारने डिझेलच्या दरात पेट्रोल पंपापेक्षा अधिक वाढ केली आहे. ९३ रुपयांना मिळणारे डिझेल १२० रुपयांना दिले जात आहे. या वाढत्या महागाईचा फटका मच्छीमारांना बसला आहे. १ मार्चपासून मासळीचे भाव वाढविण्यात आले आहेत. २०० ते ५५० रुपये किलोने मिळणारी मासळी ४०० ते १५०० रुपयांनी विकण्यात येत आहे.

अनेक दिवसांपासून डिझेलचे दर वाढवले आहेत. त्यात बदलत्या वातावरणामुळे मासळी मिळत नाही, त्यामुळे मासळीचे दर वाढले आहेत. सरकारने मासळीचा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. तसेच वाढत्या डिझेलच्या दराबाबत लवकरच मच्छीमार संघाचे राज्याचे अध्यक्ष रामदास संदे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्र्याची भेट घेऊन डिझेल वाढीचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

- विजय गिदी, संचालक, महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघ.

कोरोनामुळे मच्छीमारांना फटका बसला आहे. त्यात चक्रीवादळ, कडक ऊन, थंडी अशा बदलत्या वातावरणामुळे मच्छीमार मोठ्या संकटात सापडले आहेत; परंतु सरकारमार्फत देण्यात येणारे मच्छीमार सोसायट्यांना दिले जाणारे डिझेल प्रचंड महाग झाले आहे. त्यामुळे मच्छीमारांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.
- सत्यजित पेरेकर, व्हाईस चेअरमन, मच्छीमार संस्था, अलिबाग.

मासळीचे भाव

मासळीचा प्रकार - १ मार्चचा भाव - आताचा भाव
सुरमई - ५५० - ८००
लहान पापलेट - ४०० - ८००
मोठा पापलेट - ८०० - १५००
बांगडा - २०० - ४००
कोलंबी - ३०० ते ४०० - ४०० ते ८००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT