ठाणे : पेट्रोल पंपावर दरोडा टाकून (robbery at petrol pump) तिजोरी लुटणाऱ्या सराईत पाच जणांच्या टोळीच्या (gang busted) सांगली, सातारा येथे जाऊन मुसक्या आवळण्यात कापूरबावडी पोलिसांना (Kapurwadi police) यश आले; तर त्यांच्याकडून चोरी गेलेल्या २७ लाख ५० हजारांपैकी १५ लाख ९०० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्यांपैकी एक आजी आणि एक माजी कर्मचारी आहे. पाच जणांना ११ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाल्याची (five culprit arrested) माहिती वागळे इस्टेट परिमंडळ ५ चे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली.
घोडबंदर रोड, कापूरबावडी नाक्यावरील ब्रॉडवे ऑटो मोबाईल्स एचपीसीएल पेट्रोल पंपाचे ३१ जानेवारी रोजी रात्री ऑफीसमध्ये ठेवलेली लोखंडी तिजोरी व तिजोरीतील २७ लाख ५० हजारांची रोख रक्कम चोरी गेली होती. याप्रकरणी कापूरबावडी पोलिस गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळच्या सीसी टीव्ही फुटेजची पाहणी केली. त्या फुटेजमध्ये चोरट्यांनी आपले चेहरे मास्क लावल्याचे दिसत होते.
चौकशीदरम्यान पेट्रोल पंपावरून सोडून गेलेल्या कामगारांपैकी नयन पवार हा पैशांबाबत लालची व गुन्हेगारी वृत्तीचा असल्याची माहिती पुढे आली. फुटेजमधील चोरट्यांपैकी एकाची व नयन पवार (२०) याची शरीरयष्टीमध्ये साधर्म्य दिसून आले. त्याला सध्या सांगली येथून ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यावर सुधाकर मोहिते (३४, सांगली), विनोद कदम (२६, सातारा) व भास्कर सावंत (२७, सांगली) आणि पेट्रोल पंपावर कामास असलेला रिलेश मांडवकर (२९, रा. ठाणे) या चौघांनाही अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.