building sakal media
मुंबई

बदलापूर-अंबरनाथ : घरांचे प्रती चौ.फु मागे वाढले ५०० रुपये! शहराला महागाईच्या झळा

सकाळ वृत्तसेवा

मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा

बदलापूर : परवडणाऱ्या घरांसाठी प्रसिद्ध असलेल्या बदलापूर, अंबरनाथ (Badlapur and Ambarnath City) शहराला महागाईच्या झळा (inflation) बसत आहेत. त्यामुळेच या शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी वाढती महागाई, बांधकाम साहित्याचे वाढणारे दर याची कारणे देत दोन्ही शहरांत घरांमागे प्रतिचौरस फुटामागे ५०० रुपये (500 rs per square centimeter) वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. बदलापूर येथे नुकत्याच झालेल्या बदलापूर-अंबरनाथ या दोन्ही शहरातील बिल्डर असोसिएशनच्या (Builder Association) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्याशी संलग्न असलेल्या बदलापूर अंबरनाथ या शहरातील बांधकाम व्यावसायिकांची बदलापूर येथे बैठक पार पडली. त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला. या संघटनेशी बदलापूर व अंबरनाथमधील जवळपास ३५० हून अधिक बांधकाम व्यावसायिक संबंधित आहेत. या बैठकीत चौथी मुंबई म्हणून विकसित होऊ पाहणाऱ्या बदलापूर व अंबरनाथ शहरांच्या भविष्यातील बांधकाम क्षेत्रातील अडचणी पाहता दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. सध्या महागाई वाढत आहे, बांधकामासाठी लागणाऱ्या स्टील, सिमेंट, त्याचबरोबर मुख्य म्हणजे बांधकाम मजुरांचे दरसुद्धा वाढले आहेत.

या परिस्थितीत बांधकामाचा दर्जा जर पूर्वीसारखाच उत्तम ठेवायचा असेल, तर पूर्वीपेक्षा आता दर वाढविण्याची गरज असल्याचे बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष अजय ठाणेकर यांनी स्पष्ट केले आहे. महागाई वाढत असूनही, बांधकाम व्यावसायिकांनी घरांचे दर वाढवले नव्हते. मात्र आता बांधकाम दर्जा व महागाई यांचा समन्वय साधत ही दरवाढ अपेक्षित असल्याचे ठाणेकर यांनी स्पष्ट केले आहे. अशा पद्धतीने दरवाढ करण्याची ही पहिलीच वेळ असून, आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वाढलेले दर सर्वसामान्य नागरिकांनी स्वीकारावे, अशी मानसिकता आम्ही तयार करू. त्याचबरोबर नागरिकांना गरज असलेल्या सगळ्या सोयी-सुविधा चांगल्या दर्जाच्या पुरवण्यावर भर देऊ, असे कौन्सिलचे सदस्य असलेले बांधकाम व्यावसायिक संभाजी शिंदे व राजेंद्र घोरपडे यांनी या वेळी सांगितले. बदलापूर व अंबरनाथ शहरात भविष्यात अत्याधुनिक सुविधा व उत्तम दर्जाची घरे उपलब्ध करून देणार असून त्यासाठी पुढील महिन्यात १४ एप्रिल ते १७ एप्रिलदरम्यान भव्य असे गृहप्रदर्शन भरविण्यात येणार आल्याचेही या वेळी सांगण्यात आले.

कोरोनानंतर आता जागतिक पातळीवर निर्माण झालेली युद्धस्थिती यामुळे गेल्या वर्षभरपासून बांधकाम क्षेत्रासाठी लागणाऱ्या सिमेंट, स्टील तसेच बांधकाम मजुरांचे दरदेखील साधारण ३० ते ४० टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. खरे तर सरकारने प्रयत्न करून ही दरवाढ रोखण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याची गरज आहे.
- अजय ठाणेकर, अध्यक्ष, बदलापूर- अंबरनाथ बिल्डर असोशिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT