express trains sakal media
मुंबई

मुंबई : उन्हाळी सुट्यांनिमित्त मध्ये रेल्वेकडून विशेष एक्स्प्रेस; ९६ फेऱ्या सोडणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : उन्हाळी सुट्यांनिमित्त (summer holidays) प्रवाशांची वाढलेली गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे (central railway) पाच विशेष एक्स्प्रेस चालवणार (five special express) आहे. पुणे-जयपूर, पुणे-करमळी, मुंबई-शालिमार, नागपूर-मडगाव, पनवेल-करमळी विशेष एक्स्प्रेसच्य एकूण ९६ फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. या विशेष गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीय आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर (IRCTC Website) सुरू झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.

१. मुंबई ते शालिमार (२० फेऱ्या)
- गाडी क्रमांक ०१०१९ एलटीटी येथून १२ एप्रिल ते १४ जूनपर्यंत दर मंगळवारी रात्री ८.१५ वाजता सुटेल आणि शालिमार येथे तिसऱ्या दिवशी पहाटे ५.१५ वाजता पोहोचेल.
- परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१०२० शालिमार येथून १४ एप्रिल ते १६ जूनपर्यंत दर गुरुवारी सायंकाळी ५.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११.४५ वाजता एलटीटीला पोहोचेल.
- थांबे ः कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, रुरकेला, चक्रधरपूर, टाटा नगर, खडगपूर, संत्रागाछी

२. पनवेल ते करमळी (१८ फेऱ्या)
- गाडी क्रमांक ०१४०५ पनवेल येथून ९ एप्रिल ते ४ जूनपर्यंत दर शनिवारी रात्री ११ वाजता सुटेल आणि करमळी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता पोहोचेल.
- परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१४०६ विशेष गाडी ९ एप्रिल ते ४ जूनपर्यंत दर शनिवारी सकाळी ९.२० वाजता करमळी येथून सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी रात्री ८ वाजता पोहोचेल.
- थांबे ः रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम

३. पुणे ते करमळी (१८ फेऱ्या)
- गाडी क्रमांक ०१४०३ विशेष गाडी ८ एप्रिल ते ३ जूनपर्यंत दर शुक्रवारी पुणे येथून सायंकाळी ५.३० वाजता सुटेल आणि करमळी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता पोहोचेल.
- परतीच्‍या प्रवासात गाडी क्रमांक ०१४०४ विशेष गाडी १० एप्रिल ते ५ जूनपर्यंत दर रविवारी करमळी येथून सकाळी ९.२० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री ११.३५ वाजता पोहोचेल.

थांबे ः लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम

४. पुणे ते जयपूर (२० फेऱ्या)
- पूर्णत: एसी सुपरफास्ट असलेली गाडी क्रमांक ०१४०१ विशेष गाडी १२ एप्रिल ते १४ जूनपर्यंत दर मंगळवारी पुणे येथून रात्री १२.३० वाजता सुटेल आणि जयपूरला त्याच दिवशी रात्री ११.१० वाजता पोहोचेल.
- परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१४०२ विशेष गाडी जयपूर येथून १३ एप्रिल ते १५ जूनपर्यंत दर बुधवारी रात्री १२.३५ वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री ८ वाजता पोहोचेल.
- थांबे ः या गाडीला लोणावळा, कल्याण, वसई रोड, वापी, सुरत, भरूच, वडोदरा, रतलाम, मंदसोर, निमच, चित्तौडगड, भिलवाडा, बिजयनगर, नसीराबाद, अजमेर, किशनगड, फुलेरा

५. नागपूर ते मडगाव (२० फेऱ्या)
- गाडी क्रमांक ०१२०१ विशेष गाडी ९ एप्रिल ते ११ जूनपर्यंत प्रत्येक शनिवारी नागपूर येथून दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक ०१२०२ विशेष गाडी १० एप्रिल ते १२ जूनपर्यंत पर्यंत दर रविवारी रात्री ८.१५ वाजता मडगाव येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ८.१० वाजता नागपूर येथे पोहोचेल.
- थांबे ः वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

Jammu Kashmir Exit Poll Result: हरियाणानंतर जम्मू-काश्मीरमध्येही भाजपला धक्का; काय सांगतो एक्झिट पोलचा अंदाज? वाचा सविस्तर...

मेट्रोच्या Aarey To BKC Aqua Line भुयारी सेवेला आजपासून सुरूवात, कसं असेल भाडं आणि वेळापत्रक, जाणून घ्या...

Haryana Exit Poll Result: 10 वर्षांचा दुष्काळ संपणार! हरियाणात काँग्रेसचं सरकार? पाहा एक्झिट पोलचा अंदाज...

SCROLL FOR NEXT