Flamingo sakal media
मुंबई

फ्लेमिंगो अभायरण्याच्या बफर झोनच्या नियमावलीत बदल?

मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील विकासाला हातभार लागणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : फ्लेमिंगो अभयारण्याच्या (Flamingo sanctuary) बफर झोनच्या नियमावलीत (buffer zone rule) बदल होण्याचे संकेत केंद्र सरकारकडून (central government) मिळत आहेत. याबाबत निर्णय झाल्यास मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील विकासकामांना (Mumbai developments) मोठा दिलासा मिळू शकतो.

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन हा मुद्दा मांडला होता. या प्रश्नावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिल्याचे शेवाळे यांनी सांगितले. शिवडीपासून ठाण्यापर्यंत ठाणे खाडीचा परिसर काही वर्षांपूर्वी फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून जाहीर झाला होता. अभयारण्याचा दहा किलोमीटरचा परिसर बफर झोन गृहीत धरून तेथील विकासकामांसाठी केंद्रीय वन्यजीव मंडळांची विशेष परवानगी घ्यावी लागते. सर्वोच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वी या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार पालिकेने जुलै महिन्यात परिपत्रक प्रसिद्ध करून विकासकामे करण्यापूर्वी वन्यजीव मंडळाची परवानगी बंधनकारक केली होती. या निर्णयाचा फटका मुंबईतील २४ पैकी १३ प्रभागांतील विकासकामांना बसणार होता. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी सागरी किनारा संरक्षण कायद्यातील (सीआरझेड) काही तरतुदी शिथिल केल्यामुळे मुंबईचा मोठा भाग विकासासाठी खुला झाला होता.


काय आहे प्रकरण?

२०१८ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अभयारण्याच्या परिसरातील १० किलोमीटरचा भाग बफर झोन ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाने केंद्रीय वन्यजीव मंडळाच्या परवानगीशिवाय बफर झोनमध्ये येणाऱ्या १३ प्रभागातील बांधकामाला परवानगी देऊ नये, असे परिपत्रक जुलै महिन्यात प्रसिद्ध करण्यात आले. त्यामुळे बफर झोनबाबत शिथिलता देण्याची विनंती राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे.

या विभागांना बसणार फटका

- लालबाग, परळ, शीव, वडाळा, माटुंगा, दादर पूर्व, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर- पूर्व, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, अंधेरी- पूर्व, वांद्रे- पूर्व.

"पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन या विषयाबाबत त्वरित नव्याने अधिसूचना प्रसिद्ध करण्याची विनंती केली. त्याबाबत राज्य सरकारने पाठवलेल्या सूचनांचा अंतर्भाव करून लवकरच नवी अधिसूचना जाहीर करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिले आहे."

- राहुल शेवाळे, खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शिवसेना उबाठा गटाचे बाळा नर विजयी

Ambernath Assembly Election 2024 Result Live: अंबरनाथमध्ये बालाजी किणीकरांचा विजयी चौकार; शिवसेनेचे राजेश वानखेडे चितपट

SCROLL FOR NEXT