कल्याण ः कर्जत नगरपालिकेने साडेचार एकर जमिनीच्या डम्पिंग ग्राऊंडवर सुंदर बगीचा, फळबाग, फुलबाग उभी केली असून त्या धर्तीवर कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी कल्याण- डोंबिवली पालिका उपायुक्त रामदास कोकरे यांच्या नेतृत्वाखाली पालिका प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि अन्य कर्मचारीवर्गाने कर्जत डम्पिंग ग्राऊंडचा पाहणी दौरा केला.
महत्त्वाची बातमी : बाबरी पतनाआधी माधव गोडबोलेंनी आमच्या कानावर काही गोष्टी घातल्या होत्या, पण त्यांचं मत मागे पडलं? कारण सांगितलं शरद पवारांनी
कल्याण डोंबिवली शहर कचरामुक्त करण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त रामदास कोकरे यांची टीम काम करत असून शहरातील कचरा कसा गोळा करावा, कचरा गोळा केल्यावर त्याच्यावर कशी प्रक्रिया करू शकतो, आलेला कचऱ्यामधून उपन्न कसे वाढू शकते आणि रोजगार कसा देऊ शकतो, याचे मॉडेल कर्जत नगरपालिकेने राबविले आहे. या मॉडेलची पाहणी करण्यासाठी उपायुक्त रामदास कोकरे यांच्या नेतृत्वाखाली पालिका 10 प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि घनकचरा विभाग अधिकारी, कर्मचारीवर्गाने कर्जत डम्पिंग ग्राऊंडचा दौरा केला.
महत्त्वाची बातमी: सुशांतची हत्या नव्हे तर आत्महत्याच, एम्सने CBI कडे पाठवला अहवाल
साडेचार एकर जमिनीवर शहरातून वर्गीकरण करून सुका आणि ओला कचरा आणला जातो. त्यावर प्रक्रिया करून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यातून रोजगार आणि पालिकेला उत्पन्न कसे वाढवावे, याचे पालिका उपायुक्त रामदास कोकरे यांनी मार्गदर्शन केले. पालिका प्रभाग क्षेत्र अधिकारी यांनी दिवसातून अर्धा ते एक तास दिल्यास फेरीवाले यांच्यावर नियंत्रण कसे राहील आणि त्यांचा कचरा आणि प्लास्टिक बंदी कशी करता येईल, याविषयी कोकरे यांनी माहिती दिली.
आयुक्त घेणार आढावा
कर्जत डम्पिंग ग्राउंडवर अनेक शाळा कॉलेज विद्यार्थी सहल काढत अभ्यास करत आहेत. तसेच कर्जत डम्पिंगप्रमाणे कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर फुलबागा, फळबागा आणि कचऱ्यावर प्रक्रिया असे उपक्रम राबविण्यात येणार आहे. आज पाहणी दौरा केला असून 6 ऑक्टोबर रोजी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या दालनात अधिकारीवर्गाची आढावा बैठक घेऊन पुढील धोरण ठरवू.
- रामदास कोकरे, उपायुक्त, कल्याण डोंबिवली महापालिका
A flower garden will be set up at the dumping ground in Kalyan
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.