रोहा : ऑर्किड शेती दाखवताना श्रीनिवास सत्या . 
मुंबई

अशी बहरली रायगडमध्ये फुलशेती

अरविंद पाटील

रोहा : रायगड जिल्ह्यात भातशेतीचे क्षेत्र कमी होत असले तरी फुलशेतीसाठी सुवार्ता आहे. उच्चशिक्षित शेतकऱ्यांनी पॉलिहाऊस पद्धतीने जरबेराशेतीनंतर ऑर्किड फुलशेतीचा प्रयोग सुरू केला आहे. या प्रयत्नातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवी दिशा मिळण्याची शक्‍यता आहे. 

पारंपरिक भातशेतीसाठी जिल्ह्याची ख्याती आहे. त्याशिवाय दोडकी, वाल, मूग, कणका, रताळी अशी इतरही पारंपरिक पिके घेतली जातात. जिल्ह्यातील कलिंगड पिकही वाखाणण्याजोगे घेतले जात आहे. असे असले तरी अनेक जण शेती ओस टाकून नोकरीच्या आशेने शहराकडे धाव घेत आहेत; तर दुसरीकडे मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडून अनेक तरुण शेतीकडे वळले आहेत. नवनवे प्रयोग सुरू केले आहेत. 
गौळवाडीत सध्या वास्तव्य करत असलेले शेतकरी श्रीनिवास सत्या यांनी 20 एकर शेतीपैकी 20 गुंठे शेतीवर पॉलिहाऊस उभारले आहे. 

यापूर्वी पेण तालुक्‍यातील गोगदे गावी भरत महाडिक यांनी जरबेरा फुलांची यशस्वी शेती केली आहे. जिल्ह्यातील लहान-मोठ्या नद्या, बंधारे यामुळे पाण्याची मुबलकता असून पॉलिहाऊस शेतीसाठी पोषक वातावरण असल्याचे शेतकरी सांगतात. 

असे आहे अर्थकरण 
श्रीनिवास सत्या यांनी 20 गुंठ्यात 20 हजार ऑर्किडची रोपे लावली आहेत. 10 दिवसांत त्यापासून फुलांचे उत्पादन मिळायला सुरुवात होईल, असे ते सांगतात. 
वर्षभरात ऑर्किड प्रत्येक रोपापासून फुलांच्या 7 ते 8 काड्या मिळतात. प्रत्येक काडीला 10 ते 12 रुपये बाजारभाव मिळतो. म्हणजेच वर्षभरात 1 लाख 40 हजार ते 1 लाख 60 हजार फुलांच्या काड्यांचे उत्पादन मिळते. वर्षभरात साधारणपणे 14 ते 16 लाखांचे उत्पन्न मिळते. यातून अंदाजे 4 ते 6 लाखांचा खर्च वजा धरला तरी अंदाजे 10 लाखांचा नफा निघतो. 

पारंपरिक शेतीपेक्षा पॉलिहाऊस शेतीत खर्च जास्त मेहनत कमी, मात्र बाजाराचे योग्य व्यवस्थापन केल्यास नफाही चांगला मिळतो. त्यामुळेच 20 गुंठे जागेत ऑर्किड शेती केली आहे. 
- श्रीनिवास सत्या, शेतकरी, रोहा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwa: केजरीवालांना मोठा धक्का! दिल्ली सरकारच्या मंत्र्याने दिला राजीनामा; भाजपचं नाव घेत पक्षावर आरोप

बापाच्या जिवावर कॉन्‍ट्रॅक्‍टर झालेल्या नारळफोड्याने माझ्यासमोर उभं राहून दाखवावं; आमदार गोरेंचा कोणाला इशारा?

बाप'माणूस! सरकारी रुग्णालयातील अग्निकांडात याकूबने परक्यांच्या बाळांना वाचवले, मात्र आपल्या जुळ्या मुली गमावल्या...

Chh. Sambhajinagar Crime : नऊ तोळे सोने मोडले दुसऱ्याच्या नावाने, यशस्विनी पतसंस्थेच्या घोटाळ्याची न्यायालयात माहिती

'Rishabh Pant ला हॉस्पिटलमध्ये पाहिलं तेव्हा वाटलं परत क्रिकेट...', रवी शास्त्रींनी सांगितली आठवण

SCROLL FOR NEXT