मुंबई : तळलेल्या तेलाचा वारंवार वापर (oil regular use) केल्यास ते आरोग्यास (injurious to health) अपायकारक ठरू शकते. अशा खाद्य तेलाचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब (High blood pressure), एथेरोस्क्लेरोसिस (atherosclerosis) ,अल्झायमर,यकृत रोग (Liver disease) होण्याचा संभव असतो. अशा तेलाची बेकायदेशीरपणे विक्री (illegal selling) करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (Food and drug administration) कारवाई सुरू केली असून “तेलाचा वारंवार वापर टाळा, आपले आरोग्य सांभाळा" असे आवाहनही केले आहे.
स्वयंपाकाचे तेल पुन्हा गरम करण्याची किंवा तळण्यासाठी तेच तेल वापरण्याची प्रथा सामान्य आहे. स्वयंपाकाचे तेल वारंवार ताजे तेल टाकून वापरले जाते. सामान्यतः, तळलेले खाद्यपदार्थ तयार करण्यात गुंतलेले मोठे खाद्य व्यवसाय त्यांच्या वापरलेल्या स्वयंपाकाच्या तेलाची औद्योगिक कारणांसाठी विल्हेवाट लावतात, परंतु काहीवेळा ते स्वस्त किमतीत लहान खाद्य विक्रेत्यांकडे जाते.
घरगुती स्तरावर किंवा रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्यांद्वारे, सीवरेज आणि ड्रेनेज सिस्टम्समध्ये अडथळा आणणाऱ्या पर्यावरणास घातक पद्धतीने वापरलेले तेल फेकून दिले जाते. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने एकूण तेल शुद्धीकरणासाठी असणारी टीपीसी मर्यादा 25 % पेक्षा जास्त नसावी असे सूचित केले आहे.यापुढे ते मानवी सेवनासाठी असुरक्षित ठरू शकते असे अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी सांगितले.
अन्न पदार्थ वारंवार तळलेल्या तेलात पुनः तळल्यास त्याचे गुणधर्म बदलतात. त्याचे सेवन केल्यास अनेक आजार होऊ शकतात.म्हणून खाद्य तेलाच्या गुणवत्तेचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी, एफएसएसए आय ने एकूण टीपीसी मर्यादा 25 टक्के निश्चित केली आहे.या पुढे खाद्य तेलाचा वापर केला जाऊ नये. तेलाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी एफएसएसएआय ने एक धोरण राबवत आहे अशी माहिती ही केंकरे यांनी दिली.
स्वयंपाकाच्या तेलाबाबत ही काळजी घ्या
1) तळण्यासाठी स्वयंपाकाच्या तेलाचा वारंवार वापर टाळा.
2) वापरलेले कुकिंग तेल एक किंवा दोन दिवसांत सेवन करावे.
3) तेलातून निळा राखाडी धूर दिसतो किंवा कडक फेस तयार होतो किंवा तेल गडद आणि घट्ट होते किंवा तेलाची सुसंगतता बदलते तेव्हा स्वयंपाकाचे तेल टाकून द्या. 4)टाकून दिलेले तेल नाल्यांमध्ये टाकू नका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.