मुंबई: मुंबईतील सत्र न्यायालयाने (Mumbai court) वैवाहिक नात्यातील (Married relation) संबंधांबाबत एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलय. मुंबईत राहणाऱ्या एका महिलेने नवऱ्याविरोधात (women allegation against Husbund) सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात तिने नवरा इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीरसंबंध (forced sex relation) प्रस्थापित करतो, असा तिने आरोप केला होता. पण अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजश्री घरात यांनी महिलेने केलेल्या तक्रारीला कायदेशीर आधार नसल्याचे म्हटले आहे.
"या प्रकरणात नवरा आरोपी असून त्याने काही बेकायदेशीर कृत्य केलय अस म्हणता येणार नाही" असे न्यायाधीशांनी म्हटलं आहे. मागच्यावर्षी २२ नोव्हेंबरला महिलेचं लग्न झालं. लग्नानंतर नवरा आणि त्याच्या कुटुंबीयांनी आपल्यावर बंधन घालायला सुरुवात केली. मला टोमणे मारायचे. शिवीगाळ करायचे आणि पैशांची सुद्धा मागणी केली, असे महिलेने पोलिसांना सांगितले. लग्नानंतर महिन्याभराने नवऱ्याने आपल्या मर्जीविरुद्ध शरीरसंबंध ठेवले, असा महिलेने आरोप केला.
दोन जानेवारीला हे जोडपे महाबळेश्वरला गेले होते. त्यावेळी नवऱ्याने पुन्हा इच्छेविरुद्ध तसेच केले. त्यानंतर आपल्याला अस्वस्थ वाटू लागलं. आपण डॉक्टरकडे गेलो. त्यावेळी तपासल्यानंतर डॉक्टरने कमरेखालच्या भागाला पक्षघात झाल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेने नवरा व त्याच्या कुटुंबीयांविरोधात एफआयआर नोंदवला. नवरा आणि त्याच्या कुटुंबीयांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली. सुनावणी दरम्यान नवऱ्याच्या कुटुंबीयांनी आपल्याला चुकीच्या आरोपामध्ये गोवण्यात येत असून आपण कुठल्याही हुंड्याची मागणी केलेली नाही असे सांगितले.
आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर करायला फिर्यादी पक्षाने विरोध केला. महिलेने हुंड्याच्या मागणी करत असल्याची तक्रार केली. पण किती रक्कम मागितली ते सांगितलेले नाही, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे. जबरदस्तीने शरीरसंबंध याला कायदेशीर आधार नाहीय, असं निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवलय. "तरुण मुलीला पक्षघात झालाय हे दुर्देव आहे. पण त्यासाठी नवरा आणि त्याच्या कुटुंबीयांना जबाबदार धरता येणार नाही. जे आरोप केलेत, त्यासाठी कोठडीत चौकशीची गरज नाहीय. अर्जदार चौकशीत सहकार्य करायला तयार आहेत" असं न्यायाधीश घरत यांनी म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.