Foreign cigarettes worth 24 crore seized from Nhava Sheva port 5 arrested DRI action crime mumbai  esakal
मुंबई

Mumbai Crime : न्हावा शेवा बंदरातून 24 कोटींच्या परदेशी सिगरेट जप्त; डीआरआयच्या कारवाईत 5 अटकेत

कंटेनरच्या हालचालींवर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी नजर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : डीआरआयने केलेल्या कारवाईत मुंबईच्या न्हावा शेवा बंदरातून 24 कोटींच्या परदेशी सिगारेट जप्त करून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआय मुंबईला न्हावा शेवा बंदरात सिगारेटची तस्करी करणाऱ्या कंटेनरची माहिती मिळाली होती.

त्यानुसार या कंटेनरची माहिती घेण्यात आली. त्यावेळी पुढील मंजुरीसाठी कंटेनर अर्शिया फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोनमध्ये उतरवला जाणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली. या कंटेनरच्या हालचालींवर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी नजर ठेवली होती. कंटेनरने बंदर सोडल्यानंतर, तो ठऱलेल्या ठिकाणी जाण्याऐवजी तो कंटेनर अर्शिया एफटीडब्ल्यूझेडकडे जात असताना एका खाजगी गोदामामध्ये नेण्यात आला.

या कंटेनरच्या हालचालीवर लक्ष ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना संशयास्पद वाटल्याने आणि त्यांनी कंटेनर गोदामात अडवला. तपासणीत, संपूर्ण 40 फूट कंटेनर विदेशी सिगारेटने भरलेले आढळले. या सिगारेटच्या आयातीवर भारतात बंदी आहे. सीमाशुल्क विभागाचा ससेमिरा चुकवण्यासाठी या गोदामात सिगारेट काढून त्यात कागदपत्रानुसार जाहीर करण्यात आलेल्या वस्तू भरण्यात येणार होत्या. तपासणीत गोदामात कागपत्रांमध्ये घोषित केलेला माल यापूर्वीच भरून ठेवण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT