मुंबई: "उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांची शिवसेना (shivsena) म्हणजे बनावट कागदपत्र बनवणारी, जनतेची फसवणूक करणारी सेना आहे. मातोश्रीत बनावट कागद पत्र बनवणारी टोळी तयार झालीय" असा आरोप माजी खासदार आणि भाजपा नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी केला आहे. पुढच्यावर्षी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक (bmc election) आहे. त्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. (Former mp & bjp leader kirit somaiya slam uddhav thackeray & kishori pednekar over scam in sra)
महापौर किशोरी पेडणेकर या SRA चे गाळे गिळंकृत करतात, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. "महापौरांनी स्वत:च्या वॉर्डात वरळीमध्ये गोमाता जनता SRA चा विकास केला. महापौर स्वत: बेनामी गाळ्यामध्ये राहतात. तसं त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात नमूद केलय. किशोरी पेडणेकर यांनी स्वत:ची कंपनी स्थापन केली. मुलगा कंपनीत रुजू झाला. कोरोनाचं संकट महापौरांसाठी वरदान ठरलं. कोविडची कंत्राट महापौरांच्या मुलाच्या कंपनीला मिळाली" असा आरोप सोमय्या यांनी केला.
SRA मध्ये गरीबांना मंजूर झालेले गाळे, महापौरांनी गिळले असा आरोप सोमय्यांनी केला. त्यासाठी त्यांनी संजय अंधारीचं उदहारण दिलं. संजय अंधारी झोपडपट्टीमध्ये रहात होता. त्याला दिलेला गाळा महापौरांनी घेतला. अशी बेईमानी करणाऱ्या महापौरांची पदावरून हकालपट्टी झाली पाहिजे. पोलीस, महापालिका सगळीकडे अधिकृत तक्रार केलीय. कोण व्यक्ती आहे, त्याचे डिटेल्स पण दिले आहेत असा सोमय्या यांनी सांगितले.
सोमय्या यांनी पुन्हा एकदा अनिल परब यांच्या दापोलीतल्या रिसॉर्टवरुन आरोप केले. काही कागदपत्रे त्यांनी सादर केली. "मला संजय राऊत यांचं कौतुक करायचं आहे. PMC बँकेचे पैसे त्यांनी परत केले. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांनी पण चोरीचा माल परत करावा. या दोघांनी संजय राऊतांकडून शिकावं की चोरीचा माल कसा परत करायचा" असे सोमय्या म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.