Sanjay Pandey  Esakal
मुंबई

Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंनी घेतली लोकसभेतून माघार, 'या' नेत्यांमध्ये होणार थेट लढत

Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. संजय पांडे मुंबई उत्तर मध्य येथून लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. संजय पांडे मुंबई उत्तर मध्य येथून लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. स्थानिकांच्या आग्रहाखातर संजय पांडे निवडणूक लढवणार होते. मात्र, त्यांनी या निवडणूकीतून माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान उत्तर मध्य मुंबईतून महाविकास आघाडीने वर्षा गायकवाड यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर महायुतीकडून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना तिकिट देण्यात आलं आहे. अशातच मुंबई पोलिस दलाचे माजी आयुक्त संजय पांडे देखील या ठिकाणी निवडणूक लढवण्यास इच्छुक होते.

माजी आयपीएस अधिकारी संजय पांडे हे १९८६ च्या बॅचचे IPS आधिकारी आहेत. डीजी होमगार्ड, पोलीस महासंचालक, मुंबईचे आयुक्त म्हणूनही त्यांनी कर्तव्य बजावलेलं आहे. स्थानिकांनी संजय पांडे यांनी निवडणूक लढवण्याची मागणी केल्याने उत्तर मध्य मुंबईतून तिरंगी तढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.मात्र वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे.

कोण आहेत संजय पांडे?

संजय पांडे हे १९८६ च्या तुकडीचे पोलीस अधिकारी होते. त्यांनी आयआयटी कानपूर येथून माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. पुण्यात सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून त्यांचा पोलीस सेवेत सुरूवात केली. मुंबईत १९९२-९३ मध्ये उसळलेल्या जातीय दंगलीच्या वेळी ते पोलीस उपायुक्त होते. मुंबईत त्यावेळी स्थापन करण्यात आलेल्या परिमंडळ-८ चे ते पहिले पोलिस उपायुक्त होते.

संजय पांडे यांनी १९९५ ते १९९८ या युती सरकारच्या काळामध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात कारवाया केल्या होत्या. १९९८ मध्ये हॉवर्ड विद्यापीठात मास्टर्स केल्यानंतर ते काही काळ तत्कालीन पंतप्रधानांच्या सुरक्षा पथकामध्ये होते. २००१ मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता, मात्र तो स्वीकारण्यात आला नाही. प्रकरण न्यायालयात गेले. त्यावेळी त्यांनी स्वेच्छा निवृत्तीही घेण्याचा प्रयत्न केला.

न्यायालयीन लढाईनंतर पुन्हा २०११ मध्ये ते पोलिस दलात परतले. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस महासंचालक व मुंबई पोलीस आयुक्त अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. पांडे हे ३० जून २०२२ रोजी मुंबई पोलिस आयुक्त म्हणून सेवेतून निवृत्त झाले.

बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात पांडेंना झालेली अटक

संजय पांडे यांच्या कंपनीने जवळजवळ आठ वर्षे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) कर्मचार्‍यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याची माहिती सीबीआयला (CBI) मिळाली. संजय पांडे यांच्या iSEC सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं रेड सर्व्हर नावाच्या उपकरणांचा वापर करून हे फोन टॅप केल्याचा आरोप सीबीआयने आणि ईडीनं केला होता. याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना अटक करण्यात आली होती.

वाकोला येथील रहिवाशाच्या सूचनेनुसार उत्तर मध्यसाठी सुरू झालेली ही मोहीम काहींच्या कल्पनेत अडकली आणि अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कणकवली मतदारसंघात पहिल्‍या फेरीत भाजपचे नितेश राणे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT