Navi mumbai city google
मुंबई

देशातील स्वच्छ शहरांमध्ये नवी मुंबईचा दबदबा; सौंदर्यीकरणासाठी ४३ कोटींचा वापर

सकाळ वृत्तसेवा

वाशी : स्‍वच्छता अभियानात (cleaning campaign) केलेल्या चांगल्या कामासाठी केंद्र व राज्य सरकारकडून (central and state government) नवी मुंबई महापालिकेला (Navi Mumbai municipal corporation) आतापर्यंत अनेक मानांकने प्राप्त झाली आहेत. विविध पारितोषिकांच्या स्‍वरूपात महापालिकेला आतापर्यंत ४३ कोटी इतकी रक्कमप्राप्त झाली असून हीच रक्कम शहराचा लौकिक आणखी उंचावण्यासाठी व सौंदर्यीकरणासाठी (beatification) उपयोगात आणली जाणार आहे. देशातील स्वच्छ शहरांमध्ये अनेक वर्षांपासून नवी मुंबई आपले स्थान टिकवून आहे.

केंद्राकडून होणाऱ्या विविध देशपातळीवरील मानांकनांमध्ये, तसेच राज्य शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या विविध स्पर्धामध्ये नवी मुंबईचे वर्चस्व अबाधित आहे. अशा स्पर्धांमधून प्राप्त झालेली पारितोषिकांची भरीव रक्कम शहराचे सौंदर्य आणखी खुलविण्यासाठी वापरण्याचे महापालिकेचे प्रयत्‍न आहेत. नुकत्याच सादर झालेल्‍या महापालिकेच्या अंदाजपत्रकात महापालिकेला विविध पारितोषिकांमधून ४३ कोटी एवढी भरघोस रक्कम मिळाल्‍याचे नमूद आहे.

या रकमेतूनच ‘माझी वसुंधरा’अंतर्गत उद्याने व ग्रीनबेल्ट बनवणे, तसेच प्रदूषणविरहित उपक्रमासाठी इलेक्ट्रिक बस, तसेच सफाईमित्र पुरस्कारामधून उद्याने अशा विविध गोष्टी केल्या जाणार आहेत. आयुक्तांनी सायन-पनवेल मार्गावरील दिवाबत्ती सुविधा महापालिकेकडे घेतली असून आगामी काळात या मार्गावरील पदपथ व दुभाजक यांचे व महामार्ग स्वच्छतेचे कामही करण्यात येणार आहे.

राज्यांतर्गत स्वच्छता अभियान स्पर्धांमध्ये सुरुवातीची सलग अनेक वर्षे नवी मुंबई महापालिकेला प्रथम क्रमांक मिळाला. त्यामुळे पालिकेने बक्षीस रूपातून मिळालेल्या रकमेतून आयुक्त बंगल्याच्या पाठीमागे रॉक गार्डन अर्थात संत गाडगेबाबा उद्यान विकसित केले आहे. नवी मुंबई शहराला सातत्याने राज्य व देशपातळीवरील सन्मान प्राप्त झाले असून त्यातून उद्याने तसेच स्वच्छता अभियानाअंतर्गत अनेक कामे करण्यात आल्याची माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे यांनी दिली.

शहराला अनेक मानांकने

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये मोठ्या शहरांमध्ये सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान नवी मुंबईला मिळाला आहे. तसेच कचरामुक्त शहराचे फाइव्ह स्टार मानांकन व हागणदारीमुक्त शहरांच्या श्रेणीतील ओडिफ वॉटरप्लस हे सर्वोच्च मानांकन मिळणाऱ्या देशातील नऊ शहरांमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे. सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज अभियानात देशात द्वितीय क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे. त्याचप्रमाणे प्रथमच नव्याने समाविष्ट झालेल्या प्रेरक दौड सन्मान विभागामध्येही सर्वोच्च दिव्य मानांकन प्राप्त झाले आहे. राज्‍य सरकारच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये नवी मुंबई द्वितीय क्रमांकाचे शहर ठरले आहे.

स्वच्छता कर्मचाऱ्यांचे परिश्रम

विविध मानांकनांमध्ये नवी मुंबईकरांचा सक्रिय सहभागात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे श्रमाचा मोठा वाटा आहे. याशिवाय जे. जे. कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्‍या भितीचित्रांमुळे शहराला आकर्षक व देखणे रूप प्राप्त झाले आहे. नवी मुंबई शहरातून जाणारा सायन-पनवेल महामार्ग व त्याच्या सौंदर्यीकरणासाठीही महापालिका आग्रही आहे. तसेच राज्य व केंद्र शासनाकडून पारितोषिक प्राप्त झाल्यानंतर शासनाकडूनच कोणत्या कामासाठी ही रक्कम वापरावी, याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या जातात.

५०० चित्रकारांनी साकारली चित्रे

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ ला सामोरे जाताना स्वच्छतेबरोबरच सुशोभीकरणावर भर देत शहराला नवी झळाळी प्राप्त करून दिली जात आहे. आकर्षक भित्तिचित्रे, लक्षवेधी शिल्पाकृती, विविध रंगांनी नटलेले उड्डाणपूल व भुयारी मार्ग कारंजी, आकर्षक रोषणाईने केलेले विद्युत खांब व सिग्नल्स यांनी नवी मुंबईचे रूप अधिकच खुलले आहे. दिघ्यापासून बेलापूरपर्यंत संपूर्ण महापालिका क्षेत्रात शहर सुशोभीकरणाच्या कामाने गती घेतली आहे. संपूर्ण शहरात ५०० हून अधिक चित्रकार कलावंतांनी नावीन्यपूर्ण चित्र संकल्पना राबवीत शहराचे स्वरूप अधिक आकर्षक बनविले आहे.

देशात व राज्यात होणाऱ्या विविध स्पर्धांत नवी मुंबई महापालिकेचा दबदबा असून शहरात राबवलेल्या चांगल्या कामांमुळेच अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यातून प्राप्त झालेली बक्षिसांची रक्कम शहर सौंदर्यीकरण व सायन-पनवेल मार्गाच्या सौंदर्यीकरणासाठी वापरली जाणार आहे. पालिकेच्या प्रत्येक यशात प्रशासनाबरोबरच
नवी मुंबईकर नागरिकांचा सिंहाचा वाटा आहे.
- अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT