मुंबई - रेल्वेत प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसंच रेल्वेत फुकट प्रवास करणाऱ्यांचीही संख्या कमी नाहीये. रेल्वेत किंवा मुंबईच्या लोकलमध्ये सत्तत टीसी लोकांचे तिकीट तपासत असतात. ज्या लोकांकडे तिकीट नाही त्यांच्याकडून हे टीसी वसूली करत असतात. अशाच मध्य रेल्वेच्या ४ टीसी यांनी प्रत्येकी तब्बल १ कोटींपेक्षा जास्त वसूली केली आहे. रेल्वेनी २०१९मध्ये फुकट प्रवाशांकडून केलेल्या दंडवसुलीची माहिती नुकतीच दिली आहे.
कोण आहेत हे टीसी:
या चार टीसींनी जबरदस्त कामगिरी केली आहे. फुकट्या प्रवाश्यांकडून टीसींनी विक्रमी दंडवसुली केली आहे. या चारही टीसींनी प्रत्येकी १ कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे.
दरदिवशी ७२ प्रवाशांकडून दंड वसूल केला गेला. एक टीसी सरासरी एका दिवसाला विनातिकीट प्रवास करणाऱ्या आठ प्रवशांकडून दोन हजार रुपये वसूल करतो. त्यामुळे एकूण वर्षाला ६.३ लाख रुपये होतात.
मोठी बातमी - मुंबईतील विकासकामे ‘मेड इन चायना’!
गलांडे, शिंदे, डी. कुमार प्रिंसिपल चीफ कमर्शियल मॅनेजरच्या फ्लाइंग स्क्वॉडमद्ये आहेत. त्यात मध्य रेल्वेशी संलग्न २९ टीसी असतात. ते लोकल गाड्या आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील फुकट्या प्रवाशांकडून दंड वसुली करतात. तर रवी कुमार मुंबई विभागात कार्यरत आहेत. त्यांना मुंबई उपनगरी लोकलगाड्यांमध्ये आणि मुंबईतून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये फुकट्या प्रवाशांकडून दंड वसुली करतात.
काय म्हणाले टीसी गलांडे
"दिवसातील सरासरी बारा ते तेरा तास मी ट्रेनमध्येच असतो. मला पत्नी आणि दोन मुलं आहेत पण ते मी घरी वेळ द्यावा यासाठी कधीच हट्ट धरत नाहीत. त्यांच्याकडूनच मला उत्साह येतो आणि ताकद मिळते. मी या कामगिरीचं श्रेय माझ्या कुटुंबाला देतो." असं गलांडे यांनी म्हंटलय.
मोठी बातमी - अनेक महिन्यांपासून मृतदेह शवागारात; वाचा काय झाले
Four Ticket checkers of central railways collected over Rs 1 crore each fines
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.