fraud news flat scammer in nalasopara arrested by virar crime branch mumbai eSakal
मुंबई

Mumbai Crime News : स्वस्त दरात प्लॅट उपलब्ध असल्याचे भासवून ग्राहकांची फसवणूक करणारा सराईत आरोपी अटक

वसई विरार नालासोपारा परिसरात स्वस्त दरात प्लॅट उपलब्द आहे अशी जाहिरात करून, घर घेऊ इच्छिणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक करणारा सराईत आरोपी अटक करण्यात विरार गुन्हे शाखा 03 ला यश आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नालासोपारा : वसई विरार नालासोपारा परिसरात स्वस्त दरात प्लॅट उपलब्द आहे अशी जाहिरात करून, घर घेऊ इच्छिणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक करणारा सराईत आरोपी अटक करण्यात विरार गुन्हे शाखा 03 ला यश आले आहे.

या आरोपीवर आत्तापर्यंत अर्नाळा, तुलिंज, नालासोपारा या पोलीस ठाण्यात फसवणुकीचे 8 गुन्हे दाखल असून, याने आजपर्यंत 2 कोटी पर्यंत ची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

रामसिंग जालमसिंग देवरा उर्फ राम पाटील असे अटक सराईत आरोपीचे नाव आहे. या आरोपीने त्याचे साथीदार स्वप्नील हळदणकर, अमोल भोईर, राहुल सिंग उर्फ सुरज दुबे, अरविंद दुबे यांच्या सोबत संगनमत करून,

विरार पूर्व ग्लोबल सिटी येथील सनसाईट्स बिल्डिंग मधील 904 हा रूम स्वप्नील हळदणकर यांच्या मालकीचा असल्याचे भासवून, सण 2022 मध्ये संतोष ठाकूर यांच्या कडून 7 लाख 83 हजार 500 रुपये घेऊन हा रूम विकला होता.

पण आजपर्यंत रूम चा ताबा दिला नसल्यामुळे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्य अनुषंगाने विरार गुन्हे शाखा 03 चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून, 27 जानेवारी रोजी आरोपीला अटक केले आहे. या आरोपीला वसई न्यायालयाने 2 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती 200 पार; महाविकास आघाडीची मोठी निराशा

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT