मुंबईः लॉकडाऊनच्या काळात जनतेला वाढीव वीज बिलाचा सामना करावा लागत आहे. आधीच लॉकडाऊनमुळे अनेकांच्या उदारनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात वीज बिलामुळे अनेकांचं कंबरडं मोडलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे.
लॉकडाऊन काळात महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीने केलेली दरवाढ तातडीने रद्द करावी, लॉकडाऊन काळातील वीज बिले भरण्यासाठी ६ महिने मुदतवाढ द्यावी, या काळात १०० युनिटपर्यंतची वीज मोफत द्यावी, अशी मागणी करणारी याचिका भाजपाचे माजी खासदार डॉ. किरीट सोमैय्या आणि ठाणे शहर भाजपा अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगापुढे दाखल केलीय.
एकाबाजूला इकॉनोमिक स्लो डाऊन, लॉकडाऊन सुरु असताना त्याच काळात २०-२५ टक्के दरवाढ केलीय. ती ताबडतोब मागे घ्या अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
अनेक ग्राहकांना सरासरी बिलाच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा बिले पाठवण्यात आलीत. आपल्या याचिकेत डॉ. सोमैय्या यांनी लॉकडाऊन काळात अनेक व्यावसायिक तसेच घरगुती ग्राहकांना आलेल्या भरमसाठ वीज बिलांकडे आयोगाचे लक्ष वेधले आहे.
लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय बंद आहेत, असं असतानाही शेकडो युनिटचा वापर केल्याबद्दल ग्राहकांना बिल पाठवण्यात आलंय. घरगुती ग्राहकांनाही अशाच पद्धतीनं चुकीची बिले पाठविण्यात आलीत. सामान्य माणसाला ही भरमसाठ वीज बिले भरणे शक्य नाही. वीज बिल भरले नाही म्हणून वीज पुरवठा खंडीत करण्याचे प्रकारही घडलेत.
तसंच वीजदरवाढीचे ताजे उदाहरण ही किरीट सोमैय्या यांनी दिलं आहे. त्यांनी त्यांच्या शेजारी असलेल्या अशोक यांचे नेहमीचे कन्झम्सन जे ५०० युनिट इतके असते. त्यांना महावितरणाने तब्बल ६३०९ युनिटनुसार ६६ हजार ९७० रुपये इतके वीज बील दिले आहे. तर दुसरे शेजारी आशिष माईणकर यांनाही ३४०० ऐवजी ५००० रुपये अर्थातच तब्बल दीड हजार रुपये अधिकचे लावून वीजबील दिले आहे.
डॉ. सोमैय्या यांनी वीज नियामक आयोगाकडे पुढील मागण्या केल्या आहेत. ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या अवाजवी वीज बिलांची फेरतपासणी करावी, वीज दरवाढ रद्द करावी, बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यास स्थगिती द्यावी, वीज कापू नये, कोरोना काळात १०० युनिटपर्यंतची वीज मोफत द्यावी तसेच ३०० युनिटपर्यंत सवलतीच्या दराने वीज द्यावी, लॉकडाऊन काळात वीज मंडळाने केलेली दरवाढ रद्द करावी, वीज बिल भरण्यासाठी ६ महिने कायदेशीर मुदत द्यावी.
या मागण्या मान्य करण्यासंदर्भात राज्य सरकार आणि राज्य वीज वितरण मंडळाला आदेश द्यावेत, अशी विनंती सोमैय्या आणि डावखरे यांनी वीज नियामक आयोगाला केली आहे.
free electricity up 100 units BJP leaders Kirit Somaiya petition MERC
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.