मुंबई : कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सॅनिटायझर टनेल उभारले जात आहेत. परंतु, या टनेलमध्ये किमान पाच सेकंद राहाणे गरजेचे असून, वारंवार वापर करणेही मानवी त्वचेसाठी घातक ठरू शकेल.
माटुंगा येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) आणि शिवाजी विद्यापीठातील प्राध्यपकांनी सॅनिटायझर टनेलचा आराखडा तयार केला असून, लवकर प्रोटोटाईप तयार करण्यात येणार आहे. निर्जंतुकीकरणासाठी या टनेलमध्ये किमान पाच सेकंद राहिले, तरच फायदा होईल. या टनेलमध्ये रसायनमिश्रित पाण्याचे अतिसूक्ष्म फवारे मारले जातात.
हे रसायन ब्लीचिंग पावडरसारखे असते. एखाद्या वेळेस हरकत नाही, पण हे रसायन वारंवार डोळ्यात जाणे घातक ठरू शकते. त्वचेची ऍलर्जी असलेल्या व्यक्तींनी या टनेलचा वापर करणे योग्य नाही, असे सांगण्यात आले.
असे होते निर्जंतुकीकरण
- पाण्यात एक टक्के सोडियम हायपोक्लोराईडचे मिश्रण.
- पाण्याच्या 0.95 मायक्रॉन आकाराच्या थेंबांची फवारणी.
- डोळ्यांमध्ये फवारा जाणार नाही, याची खबरदारी आवश्यक.
- एका नॉझलमधून पाणी, दुसऱ्या नॉझलमधून हवेची फवारणी.
- दिवसभरातून किती वेळा वापर शक्य, याची निश्चिती.
frequently using saintizer tunnel is harmful says institute of chemical technology
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.