Gabion Sakal
मुंबई

Matheran News : माथेरानमध्ये भूस्‍खलन रोखण्यासाठी ‘गॅबियन’ ठरणार वरदान

अतिवृष्‍टीमुळे शहरातील पाण्याबरोबर मातीही मोठ्या प्रमाणात वाहून जाते. जमिनीची धूप होत असल्‍याने भूस्‍खलनाच्या घटना घडतात.

सकाळ वृत्तसेवा

माथेरान - अतिवृष्‍टीमुळे शहरातील पाण्याबरोबर मातीही मोठ्या प्रमाणात वाहून जाते. जमिनीची धूप होत असल्‍याने भूस्‍खलनाच्या घटना घडतात. हे टाळण्यासाठी काळ्या दगडाच्या गॅबियनची बांधबंदिस्‍ती वरदान ठरल्‍याने एमएमआरडीएने रस्त्याच्या दुतर्फा बांधणी सुरू केली आहे.

माथेरानच्या काळ्या डोंगरावर लाल मातीचा थर आहे. यंदा जुलैमध्ये तब्बल चार हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळल्‍याने काही ठिकाणी जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप झाली. मालडुंगा पॉईंट परिसरात पावसाळी नाले नसल्‍याने भूस्‍खलनाची दुर्घटना घडली.

तर दुसरीकडे रस्त्याची कामे करताना ज्‍याठिकाणी गॅबियनची बंदिस्‍ती करण्यात आली होती, त्‍या परिसरात जमिनीची धूप अथवा भूस्खलन झाले नसल्‍याचे दिसून आले. दस्तुरी ते अहिल्याबाई होळकर चौक, एको पॉईंट, हार्ट पॉईंट, मायरा पॉईंट तसेच पॅनोरमा पॉईंट या ठिकाणी गॅबियन टाकले आहे. धूप प्रतिबंधामुळे झाडांची पडझड कमी झाली असून वनक्षेत्र वाढले आहे.

गॅबियनमुळे जंगल वाढले असून जमिनीची धूपही काही ठिकाणी थांबली आहे. माथेरान नगरपालिका ही ‘क’ वर्ग असून पालिकेचे उत्पन्न कमी असल्याने सरकारकडून गॅबियनसाठी निधी मिळाल्यास दरीकडील भागात गॅबियनची बांधणी करण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत.

- वैभव गारवे, मुख्याधिकारी

माथेरानमध्ये दरवर्षी अतिवृष्‍टी होत असून भूस्‍खलनाच्या घटना घडतात. पाण्याचा निचरा होण्यास जागा नसल्‍याने प्रवाहासह मातीही वाहून जाते. हे टाळण्यासाठी पावसाळी नाले तयार करण्याबरोबरच गॅबियनची बंदिस्‍ती गरजेची आहे. शहर नियोजनात नगरपालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.

- अरविंद शेलार, माजी नगरसेवक

पर्यावरण संवर्धनासाठी, वनक्षेत्र वाढवण्यासाठी गॅबियन संकल्‍पना योग्‍य आहे. यात कोणतेच केमिकल, सिमेंट, रेती वापरले जात नाही. फक्त काळा दगड एकत्र जाळीमध्ये टाकून भक्‍कम भिंत-बंदिस्‍ती केली जाते. एमएमआरडीएकडून काही ठिकाणी गॅबियन टाकल्या आहेत, मात्र नाले बुजणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

- मनोज खेडकर, माजी नगराध्यक्ष

भूस्खलन रोखण्यासाठी पावसाळी नाले

ब्रिटिशांनी माथेरान शहराची नियोजनबद्ध बांधणी केली. माथेरान हे उंच डोंगरावर असल्‍याने पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने झाला तरच रस्‍ते, जंगलांचे अस्‍तित्‍व टिकेल, या दृष्‍टीने त्‍यांनी नाले बांधले, महात्मा गांधी रस्ता आजही याची साक्ष देतो. मात्र त्‍यानंतर शहर नियोजनाबाबत फारसा गांभीर्याने विचार झाला नाही. आता रस्‍ते बांधले जातात, मात्र पाण्याचा निचरा होण्याबाबत योग्‍य उपाययोजना होत नसल्‍याचे शहरातील ज्‍येष्‍ठ नागरिकांमधून बोलले जात आहे.

पहिला प्रयोग यशस्वी

२००५ च्या अतिवृष्‍टीत घाटरस्ता, सखाराम-तुकाराम पॉईंट येथे भूस्खलन झाले होते. जमिनीचा मोठा भाग वाहून गेल्‍याने हजारे झाडे मुळासहित उन्मळून पडली तर काही पाण्याच्या प्रवाहाबरोबरच वाहून गेली. याचा मोठा फटका माथेरान रेल्वेला बसला.

रुळाखालील जमीन वाहून गेल्‍याने रूळही अस्‍ताव्यस्‍त पडले होते. त्‍यानंतर रेल्वे प्रशासनाने गॅबियन बंदिस्‍तीला सुरुवात केली. आज १८ वर्षानंतरही गॅबियनमुळे रेल्‍वेमार्ग सुरळीत असून घनदाट जंगल तयार झाले आहे. माथेरानमध्ये गॅबियन पहिला यशस्‍वी प्रयोग मध्य रेल्वेने केल्‍याने आता एमएमआरडीएकडून रस्‍त्‍यालगत दगडांची मजबूत बंदिस्‍ती करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT