मुंबई

मुंबईत गणेशोत्सवाला सुरुवात, कोरोनाचं सावट दूर करण्याचं लाडक्या बाप्पाकडे साकडं

पूजा विचारे

मुंबईः आज गणेश चतुर्थी. आज मुंबईत गणेशाचं आगमन होतेय. यावर्षी 
कोरोनाच्या सावटाखाली सर्व भक्त आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करत आहेत. 
चैतन्याच्या गणेशोत्सवात यंदा गणेशभक्तांनी उत्साहासोबत सामाजिक आणि सुरक्षिततेचे भान जपण्याचं आवाहन सातत्यानं राज्य शासनाकडून केले जात आहे. वर्षभर बाप्पाची वाट पाहणारे सगळेच जण आज त्याचं मोठ्या उत्साहात स्वागत करत आहे. 

कोरोनामुळे यंदाचा गणोशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. मुंबईत घरगुती पद्धतीनं सोशल डिस्टन्सिंग पाळून गणपती बाप्पाचं घरी आनंदात स्वागत केलं जात आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवाची धूम कमी झाल्याचं प्रथमच पाहायला मिळत आहे.

लालबाग म्हणजे गणेशोत्सव आणि गणेशोत्सव म्हणजे लालबाग, असंच ओळखलं जात.  लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपली 86 वर्षांची परंपरा खंडीत करून यंदा 87व्या वर्षी आरोग्यउत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. या आरोग्यउत्सवाची 3 ऑगस्ट रोजी शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरुवात झाली होती. आज सकाळी या आरोग्यउत्सवात दीपप्रज्वलन करून रक्तदान शिबिराला सुरुवात झाली आहे. यासाठी बाळासाहेब ठाकरे रक्तपेढी, के.ई. एम रुग्णालय रक्तपेढी, महात्मा गांधी रक्तपेढी ने आपला सहभाग नोंदवला आहे. लाल बागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या प्लाझ्मा दान शिबिरात आत्तापर्यंत 125 लोकांनी प्लाझ्मा दान केलं आहे. अशाच प्रकारे चांगला प्रतिसाद रक्तदान शिबिराला देखील मिळेल असा विश्वास मंडळाकडून व्यक्त करण्यात येतं आहे.

मुंबईचा राजा म्हणून गणेशगल्लीचा गणपती फार प्रसिद्ध आहे. लालबागला येणारा प्रत्येक भक्त मुंबईच्या या राजाचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. अशा या राजाचा दरबार यावर्षी ओस पडणार आहे. यावर्षी कोरोना काळात सामाजिक भान जपत त्यांनी वेगवेगळे समाज हिताचे उपक्रम राबवले. कोरोनाचं संकट असल्यानं भाविकांनी गणेशगल्ली राजाच्या दरबारात गर्दी करू नये अशी विनंती केली आहे. 

सिद्धीविनायक मंदिर न्यास यंदा सुरक्षित गणेशोत्सव साजरा करणार आहे. राज्य सरकारने अजून मंदिरांना उघडण्याचे आदेश दिले नसल्यामुळे राज्यातील सर्व मंदिरं बंद आहेत. पण मंदिरातील पारंपारिक उत्सव मर्यादीत भक्तांच्या उपस्थितीत सुरक्षितपणे साजरा करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी यंदा सिद्धीविनायक मंदिरात भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार नाही. मात्र सर्व भाविकांसाठी ऑनलाईन गणेश दर्शनाची व्यवस्था मंदिर न्यासाकडून करण्यात आली आहे.

लालबाग, परळ आणि गिरगाव परिसरातही राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक नियमांचं पालन करत गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे.

Ganesh Chaturti 2020 Mumbai Ganesh Utsav from August 22

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT