रसायनी - वासांबे-मोहोपाडा बाजारपेठेत पूजा साहित्य खरेदीसाठी सोमवारी गणेशभक्तांनी गर्दी केली होती. अवघ्या ५० रुपयांत एकवीस पत्री त्याचबरोबर केवडा, बेल, दुर्वा, लाल कमळ, गोकर्ण, जाई, जास्वंद, शेवंती, गुलाब, पारिजात, मोगरा, बोर, धोत्रा, शमी, आघाडा, डोरली, कन्हेरी, रूई, पिंपळ, मका आणि गोमूत्र आदी साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे.
ऋषिपंचमीच्या दिवशी उपवासाचे तांदूळ आणि इतर वस्तूंना महिलावर्गाकडून मागणी आहे. हा तांदूळ ८० रुपये, तर तांदळाचे पीठ १०० रुपये किलो दराने उपलब्ध असल्याचे पेण तालुक्यातील बलोली येथील बारकुबाई पाटील महिला विक्रेतीने सांगितले. गणपतीच्या मखरावर बांधण्याकरिता आवश्यक कवडाळ व पिंगवी फळे तसेच बेल, दुर्वा, फुलांची विक्री २० ते २५ रुपये वाट्याने आदिवासी महिलांकडून करण्यात येत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.