Chhatrapati Shivaji Maharaj Terminus area, where a 29-year-old woman was allegedly gang-raped in a taxi. esakal
मुंबई

Gang Rape in Mumbai: मुंबईत खळबळ! CSMT परिसरात टॅक्सीच्यामागे नेऊन २९ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

29-Year-Old Woman Abducted and Gang Raped behind taxi Near CSMT, Mumbai: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील या दुर्दैवी घटनेने संपूर्ण शहरात खळबळ माजवली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करत तपासाला सुरुवात केली आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत यापुढील काळात प्रशासनाने आणखी जागरूक होण्याची गरज आहे.

Sandip Kapde

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडवली आहे. २९ वर्षीय एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचं अपहरण करून तिला टॅक्सीमध्ये नेलं गेलं आणि तिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती आणि चिंता पसरली आहे.

टॅक्सीच्या मागे अत्याचार

हा भयानक प्रकार पी डिमेलो रोड परिसरात घडला. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचं अपहरण करून ती एका टॅक्सीच्यामागे नेलं आणि त्या ठिकाणी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. पीडित महिलेने सांगितले की, दोन आरोपींनी मिळून तिला जबरदस्तीने टॅक्सीच्यामागे  तिच्यावर अमानवी अत्याचार केले.

महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेण्यात आली आहे. सुरुवातीला जिआरपी (Government Railway Police) ने हा गुन्हा दाखल केला होता. मात्र, या प्रकरणाची पुढील चौकशी करण्यासाठी जिआरपीने एमआरए मार्ग पोलिस ठाण्याकडे हे प्रकरण वर्ग केले आहे. एमआरए मार्ग पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पोलीस तपासाला सुरुवात-

एमआरए मार्ग पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय, आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली जात आहे. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा होण्याची मागणी जोर धरत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तपासात साक्षी-पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे आणि लवकरच आरोपींना अटक करण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह

मुंबईसारख्या मोठ्या शहरात महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या घटनेमुळे मुंबईतील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलण्याची मागणी आता जोर धरत आहे. सरकार आणि प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामाजिक संघटनांकडूनही होत आहे.

या घटनेनंतर पोलिस प्रशासनाकडून सुरक्षेच्या उपाययोजना वाढवण्याची ग्वाही देण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवणे, गस्त वाढवणे आणि वाहतुकीच्या साधनांमध्ये सुरक्षा उपाययोजना करणे हे आवश्यक असल्याचं अनेकांनी सुचवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra CM : मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्रात राबवला जाणार बिहार पॅटर्न ? जाणून घ्या कारणं

Nana Patole : अखेर नाना पटोले देणार राजीनामा? विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची स्विकारली जबाबदारी

Ayurveda Tips: 'या' दोन गोष्टी पाण्यात उकळून प्यायल्यास हृदयविकाराचा धोका होतो कमी

पुष्पा 2 चं बहुचर्चित Kissik आयटम सॉंग रिलीज ; श्रीलीलाच्या अदांसमोर समांथाही पडली फिकी

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रीमंडळ विस्ताराबाबत तासभर चर्चा

SCROLL FOR NEXT