High-Court-Mumbai sakal media
मुंबई

तिहारमधून पॅरोल मिळालेले सुमारे ३,००० आरोपी बेपत्ता - हायकोर्ट

सुनिता महामुनकर

मुंबई : गँगस्टर छोटा राजनचा (gangster chota rajan) साथीदार लखनभैयाच्या चकमक प्रकरणातील आरोपी शैलेंद्र पांडे (shailendra pandey) उर्फ पिंकीचा पैरोल अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) आज नामंजूर केला. कोविड 19 मध्ये तिहारमधून (tihar jail) पैरोल मिळालेले सुमारे तीन हजार दोषी आरोपींचा शोध आता लागत नाही, असेही खंडपीठ म्हणाले.

पांडेला यापूर्वी सन 2013 मध्ये पैरोल मंजूर झाला होता. मात्र त्यानंतर तो चार वर्षे फरार होता, याची नोंद न्यायालयाने घेतली. कोविड19 च्या संसर्गामध्ये तिहारमधून पैरोल मंजूर झालेल्या तब्बल तीन हजारहून अधिक दोषी आरोपी आता सापडत नाही आहेत, अशी व्रुत्ते प्रसिद्ध झाली आहेत, असे निरीक्षण न्या एस एस शिंदे आणि न्या एन जे जमादार यांच्या खंडपीठाने व्यक्त केले. यापूर्वी पैरोलचा गैरवापर करणाऱ्या पांडेला आता पुन्हा पैरोल मंजूर केला तर त्याचा चुकिचा धोकादायक अर्थ समाजात जाऊ शकतो, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

लखनभैयाचे एन्काऊंटर वर्सोवामध्ये 11 नोव्हेंबर 2006 मध्ये झाले होते. यामध्ये एकूण 22 आरोपी असून चौदा पोलीस कर्मचारी आहेत. पांडे हा एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा तो खबरी होता. या खटल्यात सन 2013 मध्ये शर्मा सोडून सर्वांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. पांडे ला सन 2013 मध्ये पैरोल मंजूर झाला होता. पण तो फरार झाला. त्यानंतर सन 2017 मध्ये पुन्हा पोलिसांनी अटक केली. सध्या तो कोल्हापूरच्या कारागृहात आहे.

मागील वर्षी 6740 आरोपींना कोविड मुळे पैरोल मिळाला होता. यापैकी 3468 मिसिंग आहेत. तिहार कारागृह प्रशासनाने आता दिल्ली पोलिसांनची मदत घेतली आहे त्यांना हुडकायला. यापैकी बहुतेक आरोपी मधुमेह, किडनी, हायपरटेन्शन अशा आजाराचे आहेत. तिहारमध्ये सुमारे दहा हजार बंदी ठेवण्याची क्षमता आहे. कोरोना संसर्गामध्ये कारागृहात गर्दी कमी व्हावी म्हणून बंद्यांना पैरोल मंजूर केला होता, असे व्रुत्तांमार्फत सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : दक्षिण नागपूर मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे मोहन मते 15573 मतांनी विजयी

Harish Pimple Won Murtizapur Assembly Election 2024: भाजप उमेदवार हरीश पिंपळे तिसऱ्यांदा विजयी!

Chiplun Assembly Election 2024 Results : चिपळूण विधानसभा निवडणुकीत शेखर निकमांनी राखला गड; प्रशांत यादवांचा पराभव

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

SCROLL FOR NEXT