Ganpat Gaikwad  esakal
मुंबई

Ganpat Gaikwad: देशमुख अन् मलिकांना नाही तर गणपत गायकवाडांना कशी मिळाली मतदानाची परवानगी? न्यायाच्या समानतेचा मुद्दा पुन्हा उपस्थित

Ganpat Gaikwad allowed to vote for Legislative Council elections: अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारली होती, यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. गणपत गायकवाड यांना दिलेली मतदानाची परवानगी आणि न्यायाच्या समानतेचा मुद्दा विरोधकांनी जोरदार उचलला आहे.

Sandip Kapde

२०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मतदानासाठी परवानगी मागण्यात आली होती. मात्र ही परवानगी न्यायालयाने नाकारली होती. मात्र आता भाजप आमदार गणपत गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार प्रकरणात तुरुंगात असताना त्यांना मतदानाची परवानगी दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. विरोधक न्याय सर्वांना सारखा हवा, अशी मागणी करत आहेत.

संजय राऊत यांची प्रतिक्रिया-

संजय राऊत म्हणाले, "महविकासआघाडी चे तीनही उमेदवार जिंकतील. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी कोर्टाने व्होटिंग ची परवानगी नाही दिली, त्यामुळे गायकवाड यांच्याबाबत फ्रॉड निर्णय दिला आहे."

राजकीय समीकरणे बदलली-

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकारण पूर्ण बदललेले आहे. आज लागणार निकाल हा उद्याच्या चार महिन्यात लागणाऱ्या निकाल ठरवणार आहे. आजच्या निकालानंतर कोण कुठे पळून जाते हे तुम्हाला कळेल. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या इमारतीमधील राजकारण बदलले आहे.

महाविकास आघाडीचा आत्मविश्वास-

महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, असे राऊत म्हणाले. "आम्हाला बघून प्रत्येकाला मागेच फिरावे लागेल हे तुम्हाला संध्याकाळी दिसेल. मागच्या निवडणुकीनंतर काही लोकांनी येथून पळ काढला होता. आमचे तिन्ही उमेदवार हे व्यवस्थित निवडून येतील. कोण पडेल हे मी सांगू शकत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात घाण देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे."

अनिल देशमुख यांची नाराजी-

अनिल देशमुख यांनी आरोप केला की, "खोट्या केसेस करून मला तुरुंगात टाकले होते त्यावेळेस विधान परिषदेची निवडणूक होती. त्या निवडणुकीत मतदानाची परवानगी मी मागितली होती, मात्र मला परवानगी कोर्टाने नाकारली होती. खालच्या कोर्टने आणि हायकोर्टने परवानगी नाकारली होती, त्यामुळे मी मतदान करू शकलो नव्हतो."

आदित्य ठाकरे यांचे विधान-

आदित्य ठाकरे म्हणाले, "गणपत गायकवाड यांना मतदानाची परवानगी दिली. लोकशाही धोक्यात आहे. सर्वांना समान न्याय पाहिजे."

कायदेतज्ज्ञांचे मत-

कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी सकाळशी बोलताना सांगितले, "नैसर्गिक न्याय प्रक्रिया पाळल्या जात नाही. न्यायाची समानता नाही हे बऱ्याचदा दिसलं आहे. गणपत गायकवाड यांना अत्यंत गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने शिक्षा दिली आहे. तुरुंगात असताना त्यांना मतदानाची परवानगी देण्यात आली अत्यंत गंभीर गुन्हा असताना. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर गुन्हा नोंद आहे, पण गुन्हा सिद्ध झालेला नाही. त्यांना मागच्यावेळी विधानसभा, विधानपरिषद मतदान करता आलं नाही. त्यामुळे असा दुजाभाव चांगला नाही. सातत्याने आम्ही सांगत आहोत हे कायद्याचे राज्य राहीले नाही काय द्यायचे असं राज्य झालं आहे."

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारली होती, यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. गणपत गायकवाड यांना दिलेली मतदानाची परवानगी आणि न्यायाच्या समानतेचा मुद्दा विरोधकांनी जोरदार उचलला आहे. न्याय सर्वांसाठी समान असावा अशी मागणी आता जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Latest Maharashtra News Updates : नाशिकमधील रेडीसन ब्लू हॉटेलवर निवडणूक आयोगाची कारवाई

ऋषभ पंतसारखाच आणखी एका क्रिकेटपटूचा भीषण अपघात; गाडीचा झालाय चुराडा...

भावासाठी उदयनराजे मैदानात! 'झुकेगा नही साला' म्हणत, कॉलर उडवत शिवेंद्रराजेंना मताधिक्‍याने विजयी करण्याचं केलं आवाहन

Nawab Malik : मतदानाच्या एक दिवस आधीच नवाब मलिक यांचे 'एक्स' अकाऊंट हॅक

SCROLL FOR NEXT