express sakal media
मुंबई

गणपती विशेष गाड्यांच्या गोंधळलेल्या नियोजनाचा प्रवाशांना त्रास

रात्रीच्या गाड्यांना सिटिंग आणि दिवसाच्या गाड्यांना स्लीपर डबे

कुलदीप घायवट

मुंबई : मध्य रेल्वेद्वारे (central railway) नवीन 40 गणपती विशेष गाड्या (ganpati special train) चालविण्याची नुकताच घोषणा केली. मात्र, यामध्ये मध्यरात्री सुटणाऱ्या गाड्यांना फक्त 2 स्लीपर डबे (sleeper coach) आणि 18 सिटिंग डबे (sitting coach) जोडले आहेत. तर, दुपारी सुटणाऱ्या गाड्यांना 11 स्लीपरचे डबे आणि 6 सिटिंगचे डबे जोडले आहेत. ज्यावेळी प्रवासी सिटिंग गाड्यांची मागणी करतात, तेव्हा दिल्या जात नाहीत. ज्यावेळी सिटिंग गाड्या नको असतात, तेव्हा भरभरून दिल्या जातात. तर, या गाड्यांचे थांबे, गाड्या सुटण्याच्या वेळा (train timing unconfirm) अनियोजित आहेत. त्यामुळे रेल्वेच्या 40 गणपती विशेष गाड्यांच्या गोंधळलेल्या नियोजनाचा प्रवाशांना त्रास होत असून कोकणवासीयांमध्ये नाराजीचा सूर धरला आहे.

मध्य रेल्वेकडून 5 ऑगस्टपासून 40 गणपती विशेष गाड्यांची घोषणा केली होती. या गाड्यांची बुकिंग 7 ऑगस्टला सुरू करण्यात आली. मात्र, दुपारी धावणाऱ्या गाड्यांना सर्वाधिक स्लीपर डबे आणि रात्री धावणाऱ्या गाड्यांना सर्वाधिक सिटिंग डबे जोडले आहेत. तळ कोकणात कुडाळ, सावंतवाडी येथे गाड्या पोहचण्याची वेळ मध्यरात्री 1 किंवा 2 वाजता ठेवली आहे. त्यामुळे कोकणात एवढ्या मध्यरात्री पुढे गावात जाण्यास प्रवाशांना अडचणी आहेत. प्रवाशांना एवढया रात्री स्थानकावर झोपण्याची सोय रेल्वे करणार आहे का, असा सवाल कोकणवासियांकडून करण्यात येत आहे.

कोकणातील माहिती न घेता वेळापत्रक बनविले आहे. 6 सप्टेंबर, 8 सप्टेंबर या महत्त्वाच्या तारखेला एकही विशेष गाडी मुंबईवरून नाही. पनवेलवरून या दिवशी गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तसेच साधारण सहा दिवसांनी परतीचा प्रवास सूरु होतो. मात्र, या प्रवासासाठी 17,18, 19 सप्टेंबर या महत्वाच्या दिवशी या गाड्या या सोडलेल्या नाहीत. ज्या गाड्या सोडल्या आहेत, त्या मध्यरात्री गाडी 2 वाजता सांवतवाडी/कुडाळ येथे पोहचणार आणि लगेच मध्यरात्रीच मुंबईला परत निघणार आहेत. परतीच्या प्रवाशांना मध्यरात्रीच स्थानकावर यावे लागणार आहे. त्यामुळे गावावरून सायंकाळी स्थानकावर जाण्यासाठी कोणते वाहन उपलब्ध असेल. रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाबाबत प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या गाड्या रत्नागिरी/चिपळूणपर्यंतच ठेवून रात्रीच्या गाड्या सावंतवाडीपर्यंत नेऊ शकले असते. जेणेकरून सर्व गाड्या त्यांच्या शेवटच्या स्थानकात दिवस मावळायच्या आत पोहोचू शकतील. मध्यरात्री 2-2.30 वाजता प्रवासी सिंधुदुर्गमधील ग्रामीण भागातून रेल्वे स्थानकापर्यंत ये-जा कशी करतील, हा प्रश्न आहे. महाड व लांजा तालुक्यात अत्यंत कमी गाड्यांना थांबे दिलेले आहेत. गणेश मूर्तींचे माहेरघर असलेल्या पेणला एकही गाडीला थांबा नाही. रात्रीच्या गाड्यांना सिटिंग आणि दिवसाच्या गाड्यांना स्लीपर डबे लावले आहेत. रेल्वे प्रशासनाने त्यांच्या सोयीबरोबरच प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेऊन यापुढील विशेष गाड्यांचे नियोजन करावे.

- अक्षय महापदी, रेल्वे अभ्यासक

गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांना विशेष गाड्यांची सुविधा दिली आहे. यामध्ये प्रवाशांच्या मागणीनुसार त्यांना सेवा दिली जाईल.

- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

जुलै महिन्यांत 72 गणपती विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. मात्र, मुंबईतून गावी जायला 7, 8, 9,10 सप्टेंबरच्या गाड्या पूर्णपणे भरल्या आहेत. काही गाड्यांचे वेटिंग लिस्टही मिळत नाही. परतीच्या प्रवासाला 15,16,17, 18 पूर्ण भरल्या आहेत. महाड तालुक्यात वीर, करंजाडी आणि लांजा तालुक्यासाठी आडवली, विलवडेला थांबे देण्याची प्रवाशांची मागणी आहे. मात्र, अद्याप या मागणीवर रेल्वेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस वरून सुटणाऱ्या 80% एसी डबे दिले आहेत. पश्चिम रेल्वे गाड्यांमध्ये फक्त दोन स्लीपर डबे आहेत. त्यामुळे त्यात प्रतीक्षा यादी वाढत आहे. सर्वांना परवडण्यासारखे पर्याय रेल्वेने देणे आवश्यक आहे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : खेरवाडी उड्डाणपुलावर चालत्या कारने घेतला पेट

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार; गाड्यांची संख्या ९६ वरुन १०६

SCROLL FOR NEXT