Gatari Amavasya  esakal
मुंबई

Gatari Amavasya: गटारी अन् चिकन-मटणाचा फक्कड बेत! लोकांची दुकानांवर मोठी गर्दी, काय आहेत किलोचे भाव

Sandip Kapde

आज गटारी अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या आणि रविवारचा दिवस आल्यामुळे मुंबईतील लालबागच्या चिकन आणि मटन दुकानांच्या बाहेर मोठी गर्दी बघायला मिळत आहे. अनेक खवय्ये या ठिकाणी रांगा लावून चिकन-मटण विकत घेण्यासाठी थांबलेले दिसतात. आज घरी चिकन आणि मटनाचा फक्कड बेत असणार आहे.

चिकन-मटणाचे दर खालीलप्रमाणे आहेत:

बॉयलर चिकन: १७० रुपये किलो
देशी चिकन: ३०० रुपये किलो
नेट चिकन: २६० रुपये किलो
इंग्लिश चिकन: १५० रुपये किलो
कलेजी: २४० रुपये किलो
मटण: ७४० रुपये किलो

गटारी अमावस्या कशी साजरी केली जाते?

महाराष्ट्रात मराठी कॅलेंडरनुसार, आषाढ महिन्याच्या अमावास्येला गटारी अमावस्या साजरी केली जाते. श्रावण मासात पुढील ४० दिवस मांसाहार आणि मद्यपान बंद केले जाते. त्यामुळे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अमावास्येला मांस-मदिरा सेवन केले जाते. यंदा गटारी अमावस्या ४ ऑगस्ट २०२४ रोजी साजरी केली जात आहे. यानंतर महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सुरुवात होते.

गटारी अमावस्या साजरी करण्यामागचे कारण

गटारी अमावस्या साजरी करण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे श्रावण महिन्यात रोगराईचा धोका वाढतो. कारण हा महिना पावसाळ्याचा असतो. त्यामुळे या महिन्यात लोक हलके आणि सात्त्विक अन्न खाणे पसंत करतात. गटारी अमावस्या या दिवशी कुटुंबीय एकमेकांच्या घरी जेवणासाठी जातात.

गटारी अमावस्या हा सण महाराष्ट्रातील खवय्यांसाठी एक विशेष दिवस आहे, ज्यामध्ये ते आपल्या मित्रमंडळी आणि कुटुंबीयांसोबत आनंदाचा क्षण साजरा करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adar Poonawalla: पुण्याच्या बॅटमॅनने 1,000 कोटींना विकत घेतले करण जोहरच्या 'धर्मा'चे 50 टक्के शेअर्स

Latest Maharashtra News Updates : मुंबादेवीचे माजी आमदार अतुल शाह फडणवीसांच्या भेटीला

Assembly Elections 2004 : 'या' पक्षाची उमेदवारी नरसिंगरावांनी स्वीकारली आणि फक्त 11 मतांनी ते विजयी झाले'

Diwali 2024 Gift Idea: दिवाळीत मित्र अन् नातेवाईकांना द्या अप्रतिम भेटवस्तू, 500 रुपयांपेक्षा कमी बजेटमधील गिफ्टची यादी वाचा एका क्लिकवर

ऋषी कपूर यांच्या अचानक निधनाने अशी झालेली कपूर कुटुंबाची अवस्था; लेक रिद्धिमा म्हणाली- तोंडावर दाखवत नसले तरी...

SCROLL FOR NEXT