actor gaurav more  sakal
मुंबई

Gaurav More: "मी आज जो आहे तो फिल्टरपाड्याच्या शाळेमुळे.." हास्यजत्रा गाजवणाऱ्या गौरवने सांगितली आठवण

सकाळ डिजिटल टीम

Gaurav More: मराठी चित्रपटांच्या दुरवस्थेला मराठी प्रेक्षक काही प्रमाणात जबाबदार आहेत. इतर प्रादेशिक भाषेत येणारे चित्रपट मात्र सुपरहिट होतात. तेथील स्थानिक कलावंत एका रात्रीत सुपरस्टार होतात. याचे कारण त्या- त्या भाषेतील लोक आपल्या भाषेतील चित्रपट आवर्जून पाहतात. मात्र मराठी चित्रपट आपलेच मराठी प्रेक्षक पाहत नाहीत. त्यामुळे कलावंत म्हणून वाईट वाटते.

प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवू नये, असे आवाहन ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेता गौरव मोरे यांनी केले. शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या अमोल मोहन निरगुडे यांच्या ‘झटपट करोडपती कसे व्हावे’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन करताना प्रमुख पाहुणे म्हणून तो बोलत होता.

मराठी अभिनेते जेव्हा हिंदी किंवा इतर प्रादेशिक भाषेत जेव्हा दुय्यम भूमिका करतात, तेव्हा आपलेच प्रेक्षक त्यांच्यावर टीका करतात. हे अयोग्य असल्याचे सांगून गौरव मोरे पुढे म्हणाला की, मराठी चित्रपटाला प्रेक्षक मिळत नाहीत, ही अतिशय दुःखदायक गोष्ट आहे. मराठी कलावंतांमध्ये अभिनय क्षमता जबरदस्त असूनही अनेक वर्षे स्ट्रगल करण्यातच जातात.

मराठी प्रेक्षक भाषेचा अभिमान बाळगून जाणीवपूर्वक चित्रपट पाहतील, तेव्हाच मराठी चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस येतील. मी आज जो काही आहे तो माझ्या शिक्षकांमुळे आहे. फिल्टर पाड्यातील शाळेत शिकत असताना माझ्या शाळेतील शिक्षकांनी मला सतत प्रोत्साहन दिले. माझ्यातील नकारात्मक गोष्टी कमी करण्याचा प्रयत्न केला. शिक्षकांच्या सकारात्मक पाठिंब्यामुळे मी इथपर्यंत मजल मारू शकलो.

एकांकिका करण्यासाठी मी अनेक कॉलेजेस बदलली. एखाद्या गोष्टीचा सतत ध्यास आपल्याला यशापर्यंत पोहोचवतो. त्यासाठी दिवसरात्र मेहनत करण्याची तयारी ठेवायला हवी. सध्या माझे काही चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गांवर आहेत. मला रसिकांनी असाच आशीर्वाद द्यावा, ज्यामुळे मी अधिकाधिक उत्कृष्ट अभिनय करू शकेन, असे गौरव मोरे म्‍हणाला. यावेळी गौरव मोरे याच्या हस्ते ‘झटपट करोडपती कसे व्हावे’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's T20 World Cup: टीम इंडियाचा पहिल्याच सामन्यात पराभव; न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर शरणागती

Rahul Gandhi यांच्या अडचणी वाढणार? पुणे विशेष न्यायालयाने समन्स बजावले, २३ ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश, प्रकरण काय?

Raj Thackeray On Zirwal : 'तुम्ही सत्ताधारी, संविधानिक पदावर बसलेले, तुम्ही निषेध कसले नोंदवताय?'; झिरवाळांच्या आंदोलनावर राज ठाकरे संतापले

Women's T20 WC: भारत-न्यूझीलंड सामन्यात ड्रामा! रनआऊटनंतरही केरला अंपायरने दिलं नॉटआऊट, हरमनप्रीतही वैतागती; नक्की काय झालं?

Western Railway वर 5 आणि 6 ऑक्टोबरला तब्बल 10 तासांचा Block, काही गाड्या रद्द, अनेक ट्रेन विलंबाने धावणार, पाहा संपूर्ण तपशील

SCROLL FOR NEXT