मुंबई

मध्य रेल्वेच्या तिमाही कामगिरीचा महाव्यवस्थापकांकडून आढावा

मध्य रेल्वेच्या तिमाही कामगिरीचा महाव्यवस्थापकांकडून आढावा "शून्य मृत्यूची मोहीम साध्य करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची गरज" General Manager of Central Railway reviews quarterly performance vjb 91

कुलदीप घायवट
  • "शून्य मृत्यूची मोहीम साध्य करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची गरज"

मुंबई: सुरक्षा, मालवाहतूक, बिझिनेस डेव्हलपमेंट युनिट्स, मोबिलिटी, उत्पन्न, मानव संसाधन या मुद्द्यावर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी नुकतीच सीएसएमटी येथे कामगिरी बैठक घेतली. आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीतील विविध प्रमुख बाबींचा विभागनिहाय कामगिरीच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी कंसल म्हणाले की, नागरिकांची व प्रवाशांची सुरक्षा ही नेहमीच सर्वोत प्रथम असली पाहिजे. शून्य मृत्यूची मोहीम साध्य करण्यासाठी आपण आवश्यक ती पावले उचलण्याची गरज आहे. (General Manager of Central Railway reviews quarterly performance)

CSMT

मध्य रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणावर विस्तारलेले आहे. या रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी विविध गोष्टी घडत असतात. मध्य रेल्वे सुरळीच सुरू राहावी यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असतात. या उपययोजनांची निर्मिती किंवा दुरूस्ती करण्यासाठी काही ठराविक कालावधी ठरलेला असतो. त्यानुसार प्लॅनिंग केले जाते. या प्लॅनिंगपैकी तिमाहीमध्ये कोणकोणत्या योजनांची अंमलबजावणी झाली याचा आढावा व्यवस्थापकांनी घेतला. रस्ते पूल बांधणे, मानव संचलित लेव्हल क्रॉसिंगचे निर्मूलन आणि डायव्हर्शनद्वारे लेव्हल क्रॉसिंग बंद करणे किंवा थेट बंद करणे, यासारख्या सुरक्षिततेशी संबंधित कामांना गती द्यावी. भविष्यातील बांधकामांमध्ये अंगभूत नाल्यांचे डिझाइन केलेले असावे, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: महायुतीचा महाविजय, मविआचा धुव्वा ते शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना!

Panchang 24 November: आजच्या दिवशी श्री सूर्यांय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे राशिभविष्य - 24 नोव्हेंबर 2024

Imtiaz Jaleel : औरंगाबाद पूर्व विधानसभा मतांच्या फुटीचा जलील यांना फटका

Devendra Fadnavis : फडणवीस यांचा विजयी ‘षटकार’

SCROLL FOR NEXT