मुंबई

हवामान खातं म्हणतंय 'या' तारखेनंतर बरसणार मान्सून, मुंबईकरांनो पावसाळ्यासाठी तयार आहात ना ?

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईची सर्वात आवडती गोष्ट कुठली असा प्रश्न कुठल्याही मुंबईकराला विचाराल तर एकच उत्तर येईल ते म्हणजे मुंबईचा पाऊस. मुंबईकर मान्सूनची मनापासून वाट बघत असतात. मात्र यावर्षी बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळामुळे मान्सूनचा वेग मंदावणार असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे मुंबईकरांची निराशा झाली होती. मात्र आता मुंबईत लवकरच मान्सून येणार असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय. 

प्रादेशिक विशेष हवामान केंद्रानं आता मान्सून मुंबईत कधी दाखल होणार याबाबदल माहिती दिली आहे. भारतात दक्षिण-पूर्व मान्सून केरळ राज्यात ५ जूनदरम्यान येण्याची शक्यता आहे तर मुंबईत मान्सून १५ ते २० जूनदरम्यान येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच मुंबईत जून ते सप्टेंबर दरम्यान मुंबईत तब्बल २३५० मिमी पाऊस पडेल आणि जुलै आणि ऑगस्ट हे सर्वाधिक पावसाचे महिने असतील असंही प्रादेशिक विशेष हवामान केंद्रानं सांगितलंय.

मुंबईचा पाऊस जसा सगळ्यांना आवडतो तसा मुंबईकरांची चिंताही वाढवत असतो. मुंबईत पाऊस सुरु झाला की ठिकठिकाणी पाणी साठतं तसंच नाले आणि गटारं तुंबतात त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढते. याच पार्श्वभूमीवर आता बीएमसीनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. पाणी तुंबणाऱ्या भागांमध्ये पंप बसवण्याची कामं, रस्त्याची कामं, गटारं साफ करण्याची कामं  आणि अनावश्यक झाडं कमी करणं अशी कामं बीएमसीकडून केली जात आहेत. तसंच अग्निशमन दलाचे कर्मचारी मान्सूनसाठी सज्ज होत आहेत. 

मात्र यावेळी मान्सून मुंबईकरांसाठी काहीसा वेगळा असणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे परिस्थिती बिकट आहे. मान्सून येण्याच्या आधी कोरोनाच्या संकटातून आपल्याला बाहेर निघायचं आहे असं मुख्यमांत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. मात्र दिवसेंदिवस मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. त्यामुळे प्रशासनासमोर दुहेरी संकट निर्माण झालं आहे.

get ready for monsoon monsoon will hit maharashtra and mumbai by 15 to 20 june

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT