Ghatkopar Hoarding Collapse sakal
मुंबई

Ghatkopar Hoarding Collapse : होर्डिंग दुर्घटनेवरून आरोप-प्रत्यारोप ; आरोपी भिंडेचे उद्धव ठाकरेंसोबतचे छायाचित्र शेअर

घाटकोपरमधील होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेत १४ जणांचा बळी गेला. घटनेतील प्रमुख आरोपी भावेश भिंडे हा फरार झाला आहे. लोकसभा निवडणूक सुरू असल्यामुळे यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : घाटकोपरमधील होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेत १४ जणांचा बळी गेला. घटनेतील प्रमुख आरोपी भावेश भिंडे हा फरार झाला आहे. लोकसभा निवडणूक सुरू असल्यामुळे यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली आहे. भिंडे याच्या उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या छायाचित्रावरून शिवसेना, भाजपने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लक्ष्य केले आहे. त्यावर या पक्षाने उलटवार केला आहे.

घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे हा ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत काम करण्यास तयार झाला होता. त्याच्याकडे मुंबईतील होर्डिंगची जबाबदारी देण्यात आली. त्याला पालिकेकडून होर्डिंगचे कंत्राट देण्यात आले. त्या मोबदल्यात ठाकरे गटाच्या नेत्यांचे वाढदिवस आणि निवडणूक प्रचारासाठी या बेकायदा होर्डिंगचा वापर झाला, असा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केला. खरा सूत्रधार शोधण्याची गरज असल्याचे सांगून त्यांनी ‘मातोश्री’कडे अंगुलिनिर्देश केला. भाजपचे आमदार राम कदम यांनी भिंडे आणि उद्धव ठाकरे यांचे छायाचित्रवर ‘एक्स’वर शेअर केले. अनधिकृत होर्डिंगला कोणाचे संरक्षण होते, हे या स्पष्ट होते, असा आरोप त्यांनी केला.

विरोधी पक्षाचे प्रत्युत्तर

आशियातील सर्वांत मोठे होर्डिंग लावल्याचा विश्‍वविक्रम करणाऱ्या अजमेरा रिॲलिटी ॲण्ड इन्फ्रा कंपनीचे धवल अजमेरा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करून या दाव्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून झाला.

ठाकरेंचा काय संबंध? : भुजबळ

भाजपने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला दोषी धरले आहे. मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणात त्यांचा काय संबंध असा सवाल केला. ‘‘सरकार आमचे आहे, महानगरपालिकासुद्धा सध्या आमचीच आहे. मग यात उद्धव ठाकरे यांचा काय संबंध,’’ अशी विचारणा त्यांनी केली आहे.

कोण आहे भिंडे?

जानेवारी २०२४ मध्ये घाटकोपरच्या पंतनगर पोलिस ठाण्यात भिंडेवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. आरोपपत्र दाखल झाले आहे. २००९ मध्ये भिंडेने अपक्ष उमेदवार म्हणून मुलंड विधानसभेची निवडणूक लढवली होती. तेव्‍हा त्याचे डिपॉझिट जप्त झाले. बेकायदा फलक लावल्याप्रकरणी आतापर्यंत त्याला पालिकेने २१ वेळा दंड ठोठावला आहे. धनादेश बाउन्सप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. होर्डिंग कोसळल्याच्या अपघातात ‘भादंवि’च्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

IND vs AUS, BGT: चेतेश्वर पुजारा भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत दिसणार; पण फलंदाज म्हणून नाही, तर...

Kalyan: प्रचार अर्धवट सोडून उमेदवार सुलभा गायकवाड धावल्या मदतीला..!

आता तो पूर्वीसारखा नाही राहिला! अंगावर जखमा, हातात सुरा; ‘बागी ४’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर

Curry Leaves Health Benefits: औषधी गुणधर्म असलेला कढीपत्ता 'या' गंभीर आजारांना ठेवतो दूर

SCROLL FOR NEXT