Ghatkopar Hoarding Collapse Update esakal
मुंबई

"मी वाचलो पण माझ्या डोळ्यासमोर लोक चिरडले"; प्रत्यक्षदर्शीच्या शब्दात होर्डिंग कोसळल्याची थरारक कहाणी वाचा...

Ghatkopar Hoarding Collapse accident: मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याने आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेच्या वेळी पेट्रोल पंपावर उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने घटनेची संपूर्ण कहाणी सांगितली.

Sandip Kapde

Ghatkopar Hoarding Collapse Update

मुंबईतील घाटकोपरमध्ये काळ वादळी वारा आणि पावसासह मोठं संकट आलं. घाटकोपर येथे एक मोठं होर्डींग कोसळलं. या होर्डींगने अनेक लोकांचे जीव घेतले. आतापर्यंत या घटनेत १४ लोकांचा मृत्यू तर ७४ जण जखमी आहेत. कुणाचा भाऊ, कुणाचे वडील, कुणाचा मुलगा या घटनेत मृत्यूमुखी पडले. या होर्डींगवरुन आता राजकारण सुरु आहे.

मात्र तिथं जवळ एक पेटॅोल पंप होते जिथे एक माणूस उभा होता. जो थोडक्यात बचावला नंतर त्याने इतर लोकांना देखील वाचवले. त्यांनी  होर्डिंग कोसळल्याची संपूर्ण घटना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आणि त्या भीषण दृश्याचे वर्णन केले.

सोमवारी दुपारी काही हा अपघात घडला. घाटकोपरच्या पेट्रोल पंपावर अमित गुपचंदानी हे पेट्रोल भरत होते. यावेळी अनेक लोक तिथे होते. बाजूला पार्किंग होती. त्यांना कल्पानाही नव्हती की काही सेंकदात सर्वांचे आयुष्य बदलून जाईल.

ठाणे येथील व्यापारी असलेले अमित गुपचंदानी म्हणाले, "घटनेच्या वेळी मी माझ्या कारमध्ये इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेलो होतो. अचानक जोरदार वारा वाहू लागला आणि अचानक होर्डिंग पेट्रोलवर पडले. पंप, होर्डिंगखाली काही लोक दबले गेले आणि आजूबाजूचे लोक पळू लागले. सुदैवाने मी आणि माझा मित्र थोडक्यात बचावलो.

अनेक लोक होर्डिंगखाली अडकले होते. जोरात आवाज करत होते. मी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो. अनेक लोकांना वाहनात बसून रुग्णालयात पोहचवले.

या घटनेत अनेक कुटुंबांचा आधार गेला आहे. या घटनेत २१ वर्षीय कमावत्या तरुणाचा मृत्यू झाला. राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला.  पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी येताच घात झाला. भरत राठोड असं या २१ वर्षीय तरुणाचं नाव आहे. पाऊस सुरु होता त्यामुळे अनेकजण पेट्रोल पंपाचा आधार घेऊन थांबले होते. मात्र होर्डिंग कोसळल्यामुळे अनेकजण जखमी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT