Ghatkopar Hoarding Collapse  sakal
मुंबई

Ghatkopar Hoarding Collapse : सरकार, महापालिकेवर गुन्हा दाखल करा;नाना पटोले, मुंबईतील होर्डिंगमाफियांना संरक्षण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातातील मृत्यू हे मुंबई महापालिका प्रशासन व राज्य सरकारच्या बेपर्वाईचे बळी आहेत. मुंबईत दुर्घटना झाल्यानंतर महापालिका प्रशासन व राज्य सरकारला जाग येते.

घाटकोपरच्या घटनेतील होर्डिंग माफियांना भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सरकारचे संरक्षण आहे. या घटनेप्रकरणी राज्य सरकार व मुंबई महानगरपालिकेवरच सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा,’’ अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

ते म्हणाले की, घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू तर जवळपास ८८ जण जखमी झाल्याची दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. या घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपयांची मदत सरकारने जाहीर केली असली तरी ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे. ही रक्कम वाढवून दिली पाहिजे तसेच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार, मुंबई महानगरपालिकेने केला पाहिजे.

होर्डिंग्ज धोरणानुसार राज्यातील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करा,

- अंबादास दानवे,

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते

होर्डिंग कोसळलेल्या पेट्रोल पंपाला गैरमार्गाने परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी. अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्यामुळे विधिमंडळात मी मागणी करूनही उचित कारवाई झाली नाही.

- प्रवीण दरेकर, भाजप नेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT