Ghatkopar Hoarding Collapse Esakal
मुंबई

Ghatkopar Hoarding Collapse: भावेश भिंडे कोणाचा पार्टनर? घाटकोपरच्या दुर्घटनेवरून नितेश राणे यांचे गंभीर आरोप

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपरच्या छेडा नगरमध्ये सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास एक मोठे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ७४ जण जखमी झाले आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईमध्ये काल (सोमवारी) धुळीच्या वादळासह अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. घाटकोपरच्या छेडा नगरमध्ये सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास एक मोठे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ७४ जण जखमी झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत येथे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तर या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरूवात झाली आहे. या होर्डिंगचा मालक भावेश भिंडेसोबत उध्दव ठाकरे यांचा फोटो भाजपच्या सोशल मिडीया सेलकडून शेअर करण्यात आला आहे.

भावेश भिंडे हा घाटकोपरमधील दुर्घटना झालेल्या होर्डिंगचा मालक आहे. महाविकास आघाडीच्या काळात टक्केवारी घेऊन होर्डिंगसाठी परवानगी दिल्याचा आरोप भाजपने केला आहे. भावेश भिंडे याचा ठाकरे गटात प्रवेश झाल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतो आहे, दरम्यान महापालिकेत आता प्रशासक आहेत, आमची सत्ता नाही असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे.

दुर्घटनेवरून नितेश राणे यांचा हल्लाबोल

"काल वादळामुळे मुंबईत ठिक-ठिकाणी दुर्घटना झाल्या, त्यात घाटकोपरमध्ये एक मोठं होर्डिंग कोसळलं आणि असंख्य मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागला. कालपासून एक माहिती बाहेर येत आहे. ही ज्या संबंधित कंपनीची होर्डिंग होती, तिला मुंबई महानगरपालिकेने आधीच नोटीस बजावली होती. होर्डिंग लावण्याचा कार्यकाळ संपलेला आहे, म्हणून ही होर्डिंग काढून टाकाअशी ही नोटीस होती. तरीही त्या मालकाने काही ऐकलं नाही, मालकाचे नाव भावेश भिंडे आहे असं मी ऐकतोय. हा भावेश भिंडे नेमका कोणाचा पार्टनर आहे?" असा सवाल भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे.

तर नितेश राणे यांनी यामध्ये संजय राऊत यांचे नाव घेत संजय राजाराम राऊत यांचा भाऊ सुनील राऊत व भावेश भिंडेचे काय संबंध आहेत? या भावेश भिंडेचा मातोश्रीत उद्धव ठाकरेकडे घेऊन जाऊन सुनील राऊत यांनी फोटो काढला होता का?या प्रश्नाचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावं असं म्हटलं आहे.

पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, "रोज सकाळी उठून भ्रष्टाचाराचे आरोप करायचे व पत्र लिहित बसायचे. मग एक पत्र संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांना लिहावं. भावेश भिंडेचे जे पार्टनर आहेत आणि ज्यांच्यामुळे निष्पाप मुंबईकरांना जीव गमवावा लागला, ती होर्डिंग वेळेत काढली असती, तर ते सगळे मुंबईकर आज जिवंत असते. त्यांच्या कुटुंबावर आज मोठे संकट आले नसते. या दुर्घटनेस जे जे जबाबदार आहेत, व जे भावेश भिंडेचे पार्टनर आहेत; त्या सगळ्यांवर एफआयआर व्हावी, चौकशी व्हावी व संबंधितांना लवकरात लवकर अटक व्हावी अशी मागणी मी करतो", असंही पुढे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारातील घसरण थांबणार का? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Sharad Pawar : सरकार बदलायचे लोकांनीच ठरवले आहे....शरद पवार यांचे प्रतिपादन; वरवंडमध्ये रमेश थोरात यांची प्रचार सभा

श्रीदेवीसोबत तुझं कट्टर वैर होतं? माधुरी दीक्षित स्पष्टच म्हणाली- ती एक चांगली अभिनेत्री होती पण मी...

SCROLL FOR NEXT