Gajanan Kirtikar sakal media
मुंबई

एअर इंडिया मेगा नोकर भरतीत मराठी तरुणांना प्राधान्य द्या - गजानन कीर्तिकर

1184 रिक्त पदावर होणार भरती प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एअरपोर्ट ग्राउंड हॅण्डलिंग सर्व्हिसेस मध्ये जागतिक पातळीवर नामांकित असलेली कंपनी एअर इंडिया (Air India) मध्ये एकूण 1184 विविध रिक्त पदांसाठी मेगा नोकर भरती (Job recruitment) करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने टर्मिनल मॅनेजर, एअरपोर्ट ड्युटी मॅनेजर, ड्युटी ऑफीसर, ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह कस्टमर एजन्ट, रॅम्प सर्व्हिस एजन्ट, हॅण्डमॅन या पदांच्या 1184 जागा रिक्त आहेत. अनुषंगाने शिवसेना नेते व स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी एआयएसएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. रामबाबू यांची दिल्ली विमानतळावरील (Delhi Airport) त्यांच्या कार्यालयात भेट घेउन या नोकरभरती प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने शंभर टक्के मराठी तरुणांना प्राधान्य देण्यात यावे अशी आग्रही मागणी केली आहे.

त्याचप्रमाणे याच कंपनीमध्ये गेली 15 ते 17 वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंतर्गत पदोन्नती देण्यात यावी ही ठोस मागणी देखील केली आहे. त्याचप्रमाणे इतर प्रलंबीत प्रश्नावर चर्चा करताना कर्मचा-यांच्या पगारातून कोविङ च्या कारणास्तव पगारातून होणारी कपात तात्काळ थांबविण्याची तसेच पूर्वी कपात झालेली सर्व रक्कम पुनःश्च कर्मचा-यांना तात्काळ परत करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

ही नविन नोकर भरती होत असतांना पूर्वी कार्यरत असलेले एअर इंडियाचे कर्मचारी ज्यांची कंत्राट नूतनीकरण झाझीले नसतील त्यांना प्रथम कामावर रुजू करुन घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी बैठकीत एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत आस्थापनेकडून प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे एअर इंडिया स्थानिय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस प्रशांत सावंत, सरचिटणीस प्रवीण शिंदे आणि बाळासाहेब कांबळे उपस्थित होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT