maharashtra police 
मुंबई

संकटात लढा देणाऱ्या पोलिसांना विशेष भत्ता आणि बोनस द्या, न्यायालयात याचिका

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी रस्त्यावर उतरून लढा देणाऱ्या राज्यभरातील पोलिस विभागाला या कामगिरीबद्दल विशेष भत्ता आणि बोनस द्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी (ता. 21) करण्यात आली. लवकरच या याचिकेवर सुनावणी होणार आहे. 

गेल्या एका महिन्यापासून राज्यात विविध ठिकाणी कोरोनाचा धोका वाढत आहे. सरकारने लाॅकडाऊन जाहीर करून नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केला आहे; मात्र पोलिस विभाग सर्व पथकांसह रस्त्यावर तैनात आहे. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोनाचा धोका आहे. तरीही जीवाची पर्वा न करता पोलिस दल कर्तव्य बजावत आहे. असे असतानाही राज्य सरकारने नुकताच एक अध्यादेश काढून पोलिसांच्या वेतनामध्ये कपात करण्याचा निर्णय जाहीर केला . यानुसार प्रथम, द्वितीय श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या वेतनामध्ये पन्नास टक्के तर तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांंच्या वेतनात पंचवीस टक्के कपातीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयाला पुण्यातील अॅड. तौसिफ शेख आणि सतीश गायकवाड यांनी अॅड. गणेश गुप्ता यांच्यामार्फत आव्हान दिले आहे.

सध्या आर्थिक आणिबाणी निर्माण झाली नाही. त्यामुळे हा निर्णय कायदेशीर नाही, असे याचिकादारचे म्हणणे आहे. उलट कपात करण्यापेक्षा पोलिस धोकादायक परिस्थितीमध्ये काम करीत असल्यामुळे त्यांना जादा भत्ता आणि बोनस द्या, अशी मागणी  याचिकेत केली आहे. कोणाचे पगार कापले असतील, तर त्याचा परतावा द्यावा, कोरोना पासून लढण्यासाठी पोलिसांना सुरक्षा किट द्यावी, आदी मागण्या याचिकेत केल्या आहेत.

Give special allowances and bonuses to cops in distress, petition in court

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

Narayana Murthy: UPSC परीक्षेतून नव्हे तर अशा पद्धतीने करा IAS-IPSची निवड; नारायण मूर्तींनी PM मोदींना केले आवाहन

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

SCROLL FOR NEXT