अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल आज (सोमवार, ७ नोव्हेंबर) पासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. यामुळे एस. व्ही. रोड व आजूबाजूच्या परिसरात होणारी वाहतूककोंडी लक्षात घेत, वाहतूक पोलिसांनी पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे जाण्यासाठी जोगेश्वरी, अंधेरी, खार, विलेपार्ले येथील सहा पर्यायी मार्ग सुचवले आहेत.
हा गोखले पूल 1975 मध्ये बांधण्यात आला होता. त्यानंतर जुलै 2018 मध्ये तो कोसळला. त्यानंतर 2019 मध्ये सीएसएमटी येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. यावेळी सल्लागाराने गोखले पुलाच्या दुरुस्तीचा सल्ला दिला होता. त्यानुसार पालिकेने आपल्या हद्दीतील पुलाचे काम सुरू केले होते. पालिका हद्दीतील पुलाचे काम ८० टक्के पूर्ण झाल्यानंतर रेल्वे हद्दीतील पूल धोकादायक असल्याच्या अनेक तक्रारी आल्या. त्यामुळे एससीजी कन्सलटन्सी सर्व्हिस कंपनीकडून ऑक्टोबरमध्ये गोखले पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यामध्ये भेगा पडल्याने पूल धोकादायक बनला असल्याचे सांगत तो पाडण्याचा सल्ला देण्यात आला.
गोखले पूल पाडून तेथे नव्याने पूल उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पूल पाडण्यासंदर्भात नुकतेच वाहतूक पोलिसांबरोबर झालेल्या बैठकीत हा पूल आठवड्याभरात बंद करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार वाहतूक पोलिसांकडून आजपासून नोव्हेंबरपासून तो बंद करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.