national committee sakal media
मुंबई

गोंधळी समाज संघटनेची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर, मुंबई अध्यक्षपदी दिलीप शिंदे

- कृष्ण जोशी

मुंबई : अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेच्या (gondhali union) प्रदेश अध्यक्षपदी राजेंद्र गायकवाड (rajendra gaikwad) यांची तर मुंबई (mumbai president) प्रदेश अध्यक्षपदी दिलीप शिंदे (dilip shinde) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या नुकत्याच झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत या नियुक्त्या झाल्या. राष्ट्रीय कार्यकारणी (national committee) सदस्य म्हणून सुरेश ढवळे, बाबासाहेब कदम आणि विजय वाघमारे यांची तर राष्ट्रीय सहसचिव म्हणून सुरेश काळे यांची निवड झाली.

या सभेला तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, तुळजापूर नगरपरिषदेचे अध्यक्ष सचिन रोचकरी, राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र वनारसे, कर्नाटक प्रदेश अध्यक्ष शिद्राम वाघमारे उपस्थित होते. राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 10 सप्टेंबर रोजी पुणे येथे घेण्याचे ठरले. यावेळी दिलीप शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संघटनेची स्थापना, आतापर्यंतचा प्रवास व पुढील ध्येय याबाबत विचार मांडले. राजेंद्र गायकवाड यांनी स्वागत केले तर सूत्रसंचालन लातूर जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. दत्ता घोगरे यांनी केले.

विकासाची आस

गोंधळी समाज हा भटक्या आणि विमुक्त जातींमध्ये मोडतो. समाजाला असलेले अडीच ते तीन टक्के आरक्षण अत्यंत अपुरे असून समाजबांधवांचा अद्याप म्हणावा तसा विकास झाला नाही. त्यामुळे हे आरक्षण वाढविण्याची गरज आहे, असे मुंबईचे माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी सांगितले. आरक्षणासाठी गोंधळी समाजाचे रहिवासी महाराष्ट्रात 1963 पूर्वीपासून रहात असल्याचा पुरावा द्यावा लागतो. मात्र गोंधळी समाजाचे नागरिक भटक्या स्वरुपातच राज्यात रहात असल्याने अनेकांकडे स्थिर वास्तव्याचे पुरावे नाहीत.

त्यामुळे ते जेथे रहात आहेत तेथीलच वास्तव्याचा दाखला त्यांना द्यावा, अशी मागणीही शिंदे यांनी केली. समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण-वसतीगृहे यांचीही गरज आहे. या सर्व प्रश्नांसाठी एकत्र येऊन आवाज उठवण्याचीही गरज असल्याचे ते म्हणाले. ही बैठक नुकतीच तुळजापूर येथे झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राज्यभरातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या सभेसाठी देशभरातील गोंधळी समाजबांधव व संघटनेचे पदाधिकारी हजर होते. या बैठकीत राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीबरोबच विविध जिल्हा कार्यकारिणी अध्यक्षांचीही निवड करण्यात आली. यावेळी रवी रेणके ग्रूपने गोंधळी गीत सादर केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Usha Vance: अमेरिकन पॉवर झोनमधून कमला यांची एक्झिट, उषा यांची एन्ट्री! भारताशी खास कनेक्शन अन् कोण आहेत? जाणून घ्या

"तो सेटवर खूप..." अक्षय कुमारच्या सहकलाकाराचा खळबळजनक खुलासा ; "त्याच्या दोन-तीन गर्लफ्रेंड्स..."

Latest Marathi News Updates live : राहुल गांधींची थोड्याच वेळात सभा

'सिंघम अगेन'मध्ये झळकतायत एक दोन नाही तर तीन मराठी कलाकार; एकाला तर दीपिकाने ऑनस्क्रीन धुतलाय

IPL Mega Auction 2025 : लिलावात Unsold राहण्याची भीती; पृथ्वी शॉ अन् सर्फराज खान यांनी घेतला मोठा निर्णय, सर्वांना वाटले आश्चर्य

SCROLL FOR NEXT